शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘पेट’ची तारीख जाहीर; दोन दिवस होणार परीक्षा

By admin | Updated: July 1, 2017 00:49 IST

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनियंत्रित कारभाराचा नमुना ठरलेली ‘पेट-४’ परीक्षेची तारीख अखेर ठरविण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अनियंत्रित कारभाराचा नमुना ठरलेली ‘पेट-४’ परीक्षेची तारीख अखेर ठरविण्यात आली आहे. ही परीक्षा १४ व १५ जुलै रोजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील २० परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.विद्यापीठाची पेट परीक्षा घेण्याचे भिजत घोंगडे अनेक दिवसांपासून पडले आहे. महिनाभरापूर्वी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी पत्रकार परिषद घेत २ जुलै रोजी पेट-४ परीक्षा घेण्याची घोषणा केली. मात्र, यासाठी कोणतीही तयारी करण्यात आलेली नसल्याचे उघडकीस आले होते. कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे हे पेटविषयी माहिती सांगण्यासही नकार देत होते. चार अधिष्ठातांच्या हातात पेटचा कारभार देण्यात आल्यानंतर अर्जांची छाननी, प्रश्नपत्रिकांची तयारी करण्यात आली, तरीही घोषित केलेल्या तारखेला पेट परीक्षा घेण्यात अपयश आले. याविषयी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्याची घोषणा केल्यामुळे पुन्हा एकदा पेटची तारीख घोषित करण्यात आली आहे. या घोषणेनुसार १४ व १५ जुलै रोजी पेट परीक्षा औरंगाबाद, बीड, जालना आणि उस्मानाबाद येथील २० केंद्रांवर तीन सत्रांत होणार आहे. यात उद्या, शनिवारी पात्र, अपात्र विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यावर अक्षेपासाठी ४ जुलैपर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर ६ ते १० जुलैपर्यंत परीक्षार्थींना मेलवर परीक्षेचे हॉलतिकीट पाठविण्यात येणार आहेत. काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यानंतर त्या सोडविण्यासाठी विद्यापीठातील व्यवस्थापनशास्त्र विभागात केंद्र उघडण्यात आले आहे.