शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

परवानगी तीनची, बांधले सात मजले

By admin | Updated: December 22, 2015 00:10 IST

औरंगाबाद : भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने सिडकोत हॉस्पिटलसाठी तीन मजल्यांची बांधकाम परवानगी घेऊन चक्क सात मजल्यांचे टोलेजंग बांधकाम केले

औरंगाबाद : भगवान शिक्षण प्रसारक मंडळाने सिडकोत हॉस्पिटलसाठी तीन मजल्यांची बांधकाम परवानगी घेऊन चक्क सात मजल्यांचे टोलेजंग बांधकाम केले असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत दिली. संबंधित संस्थेने भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे. मात्र, परवानगीपेक्षा जास्त बांधकाम असल्यामुळे मनपाने या प्रकरणी राज्य शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, असेही अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. स्थायी समितीच्या बैठकीत काँग्रेसच्या रेशमा कुरेशी आणि एमआयएमचे सदस्य अब्दुल नाईकवाडी यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. मनपाने हॉस्पिटलच्या त्या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र दिले आहे का, त्या इमारतीच्या किती मजल्यांसाठी बांधकाम परवानगी दिलेली आहे, असे प्रश्न या सदस्यांनी उपस्थित केले. त्यावर नगररचना सहायक संचालक डी.पी. कुलकर्णी यांनी भगवान प्रसारक मंडळाच्या हॉस्पिटलच्या इमारतीची भोगवटा संचिका मंजूर झालेली नाही, ती शासनाकडे पाठविली आहे, असा खुलासा केला. त्यानंतरही सदस्यांनी जागा किती, किती मजल्यांची परवानगी दिली, असे प्रश्न विचारले. त्याविषयी खुलासा करताना कुलकर्णी म्हणाले की, संस्थेची जागा सुमारे २० हजार स्क्वेअर मीटर असून, त्यावर ७ ते ८ इमारती आहेत.त्यातील हॉस्पिटलच्या इमारतीसाठी तीन अधिक अर्धी अशी बांधकाम परवानगी दिलेली आहे; पण प्रत्यक्षात सात मजले बांधकाम झाले आहे. संबंधित संस्थेने भोगवटा प्रमाणपत्रासाठी अर्ज केला; परंतु परवाननी आणि प्रत्यक्ष बांधकाम यात फरक आहे, म्हणून आता याविषयी शासनाकडे मार्गदर्शन मागविले आहे, असेही ते म्हणाले. टीडीआर वाटप योग्यच, केवळ नोंदीत चूक...मनपात काही दिवसांपासून नगररचना विभागाने दिलेल्या बोगस टीडीआरचे प्रकरण चर्चेत आहे. काही सदस्यांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी आयुक्तांनी अतिरिक्त आयुक्तांकडे त्याची चौकशीही सोपविली आहे. नितीन चित्ते यांनी आजच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित केला. नारेगाव येथे १२ मीटरऐवजी २४ मीटरचा टीडीआर कसा मंजूर केला, असा सवाल केला. त्यावर चौकशी सुरू असल्याचे अतिरिक्त आयुक्त रमेश पवार यांनी सांगितले. सभापती थोरात यांनी नगररचनाच्या अधिकाऱ्यांनाही यावर खुलासा करण्याची सूचना केली. नारेगाव येथील प्रकरणात १२ मीटर रस्त्याचाच टीडीआर देण्यात आला आहे. केवळ नोंद करताना २४ मीटर लिहिले गेले, असा खुलासा सहायक संचालक डी.पी. कुलकर्णी यांनी केला.