शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
3
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
4
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
5
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
6
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
7
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
8
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
9
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
10
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
11
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
12
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
13
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
14
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
15
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
16
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
17
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
18
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
19
पाकिस्तानी कुरापती! गुजरात बॉर्डरवर आढळले संशयास्पद ड्रोन; विजेच्या तारांना धडकताच स्फोट
20
अंगावरचे कपडे फाडले, बेदम मारहाण; 'यु ट्युबर'वर रेल्वेतील पॅन्ट्री कर्मचाऱ्यांचा हल्ला, कारण...

‘सिद्धार्थ’च्या प्राणिसंग्रहालयाची परवानगी रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2018 23:55 IST

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देझू अ‍ॅथॉरिटीचा बडगा : नामुष्की टाळण्यासाठी मनपा अपिलात जाणार

औरंगाबाद : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबाद महापालिकेअंतर्गत सुरू असलेल्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालयाची परवानगी शुक्रवारी सायंकाळी रद्द केली. या कारवाईमुळे महापालिकेत एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईच्या विरोधात ३० दिवसांमध्ये अपिलात जाण्याची मुभा आहे. महापालिका प्रशासनाने अपिलाची जोरदार तयारी सुरू केली आहे. केंद्रीय प्राधिकरणाने २६ एप्रिल २०१८ रोजी महापालिकेला अंतिम नोटीस पाठवून परवानगी रद्द करण्याचा इशारा दिला होता.सिद्धार्थ उद्यानातील प्राणिसंग्रहालय १९८३ मध्ये सुरू करण्यात आले. मराठवाड्यातील हे एकमेव प्राणिसंग्रहालय आहे. येथील गैरसोयी आणि अपुऱ्या जागेमुळे प्राणिसंग्रहालयाची परवानगी मागील काही दिवसांपासून संकटात सापडली होती. प्राणिसंग्रहालय कायमस्वरूपी का बंद करण्यात येऊ नये, अशी विचारणा केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने २४ एप्रिल रोजी मनपाकडे केली होती. त्यानंतरही महापालिकेने कोणत्याच ठोस उपाययोजना केल्या नाहीत. त्यामुळे प्राधिकरणाचे संचालक डी. एन. सिंग यांनी कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईच्या विरोधात ३० दिवसांमध्ये अपील दाखल करण्याची मुभा आहे. महापालिका नामुष्की टाळण्यासाठी अपिलात जाणार आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर अपिलाची फाईल तयार करण्याचे आदेश दिले आहेत.एक महिन्याची मुदत२६ एप्रिल रोजी केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मनपाला नोटीस बजावून प्राणिसंग्रहालयात सुधारणा करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. २४ मे २०१८ पर्यंत अटी-शर्ती पूर्ण कराव्यात, असेही नोटीसमध्ये नमूद केले होते. प्राधिकरणाच्या निकषानुसार प्राणिसंग्रहालयात एकही बाब समाधानकारक नाही. सर्व निकष धाब्यावर बसवून प्राण्यांना ठेवण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वीही केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने महापालिकेला अशा आशयाची नोटीस बजावली होती. नोटीसमध्ये तब्बल ३५ आक्षेप नोंदविले होते.३० कोटींचा आराखडा कागदावरमहापालिकेने ३० कोटी रुपये खर्च करून प्राणिसंग्रहालयात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्यात येतील म्हणून आराखडाही तयार केला. हा आराखडा कागदावरच आहे. आराखड्यात प्राधिकरणाच्या नियमानुसार सर्व निकष पाळण्यात येतील. प्राण्यांसाठी मोठी जागा करण्यात येईल, असे आराखड्यात नमूद केले होते.पूर्वग्रहदूषित कारवाईनोटीस मिळताच मनपाने मिनी ट्रेन बंद केली. सात पिंजºयांची दुरुस्ती सुरू आहे. आराखड्यानुसार प्राणिसंग्रहालयात कामे सुरू आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाचे संचालक डी. एन. सिंग निवृत्त होत आहेत. निवृत्तीपूर्वी त्यांनी पूर्वग्रहदूषित कारवाई केल्याचा आरोप महापौर नंदकुमार घोडेले यांनी केला. मनपा अपिलात जाऊन परत परवानगी मिळविणार आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. प्राणिसंग्रहालय सुरू राहणार आहे.प्राधिकरणाचे प्रमुख आक्षेपप्राणिसंग्रहालयासाठी नेमकी सीमारेषा निश्चित केलेली नाही.उद्यानातील मिनी ट्रेनच्या कर्कश आवाजामुळे प्राण्यांना त्रास होतो.प्राणिसंग्रहालयाच्या वाढीव जागेवर ट्रॅफिक गार्डन कसे काय उभारले.प्राधिकरणाची परवानगी न घेता लांडगा हा प्राणी कसा काय आणला.सफारी पार्कच्या अंमलबजावणीसाठी नियोजित कालबद्ध कार्यक्रमच नाही.प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी स्वतंत्र पाण्याची टाकी नाही.प्राण्यांसाठी खूपच छोट्या स्वरुपाचे पिंजरे बांधले आहेत.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTigerवाघ