शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांवर भिरकावली खुर्ची, एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे कायमस्वरूपी निलंबन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:46 IST

महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दुपारी एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून अभूतपूर्व गोंधळ घातला. सभागृहात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करीत नगरसेविकांसमोर शिवीगाळ केली.

औरंगाबाद : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी दुपारी एमआयएमच्या तीन नगरसेवकांनी पाणी प्रश्नावरून अभूतपूर्व गोंधळ घातला. सभागृहात सुरक्षारक्षकाला धक्काबुक्की करीत नगरसेविकांसमोर शिवीगाळ केली. तसेच त्यांनी सभागृहातील प्लास्टिकची खुर्ची महापौरांच्या अंगावरच भिरकावली. या वर्तणुकीबद्दल एमआयएमच्या दोन नगरसेवकांचे सभागृहातील सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्यात आले.महापौर बापू घडमोडे यांचा कार्यकाल २८ आॅक्टोबर रोजी संपत आहे. त्यापूर्वी त्यांनी शेवटची नियमित सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. सभेत सर्वप्रथम पाणी प्रश्नावर चर्चा घेण्याचा आग्रह सर्वपक्षीय नगरसेवकांनी धरला. महापौरांनीही आपले शेवटचे मनोगत व्यक्त करून चर्चा सुरू केली. या चर्चेदरम्यान एमआयएम आणि भाजपा नगरसेवक आक्रमक झाले. त्यामुळे एमआयएम नगरसेवक महापौरांच्या आसनासमोर धावून आले.यावेळी राजदंडाची सुरक्षा करण्यासाठी सुरक्षारक्षक प्रमुख जाधव पुढे सरसावले. एमआयएम समर्थक तथा अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांनी जाधव यांना ढकलून दिले. तेवढ्यात एमआयएमचे नगरसेवक शेख जफर (बिल्डर) आणि सय्यद मतीन त्यांच्या अंगावर धावून गेले. या गोंधळामुळे महापौरांनी नगरसेवक अजीम अहेमद, सय्यद मतीन, शेख जफर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी रद्द करण्याची घोषणा करून सभा तहकूब केली. चिडलेल्या मतीन आणि जफर यांनी महापौरांच्या दिशेने खुर्च्या भिरकावण्यास सुरुवात केली. याच दरम्यान, नगरसेवक मतीन, जफर यांनी महापौरांच्या समोर ठेवलेला राजदंड पळवून नेला. अखेर सुरक्षारक्षकांनी राजदंड जप्त करून परत महापौरांसमोर आणून ठेवला.गोंधळाचा अहवाल शासनाकडे पाठवामहापौरांनी अपक्ष नगरसेवक अजीम अहेमद यांना सदस्यत्व बहाल करून मतीन आणि जफर यांना सभागृहाबाहेर जाण्याचे आदेश दिले. दोघांवर गुन्हा दाखल करावा, त्यांच्या गोंधळाचा अहवाल शासनाकडे पाठवा, असे आदेश महापालिका प्रशासनाला दिले. थोड्या वेळात सभागृहात पोलीस दाखल झाले. त्यांनी एमआयएमच्या गोंधळी नगरसेवकांना ताब्यात घेतले. नगरसेविकांनी पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद