शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

कायमस्वरूपी लायसन्ससाठी ‘आरटीओ’चे ड्रायव्हिंग स्कूलशी साटेलोटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 17:02 IST

स्कूलच्या उमेदवारांची चाचणी बाहेर, तर नागरिकांची कार्यालयात 

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयात कायमस्वरूपी लायसन्ससाठी चक्क दोन वेगवेगळ्या पद्धतींनी चाचणी घेतली जात आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थींची कार्यालयाबाहेर रस्त्यावर, तर स्वत:हून सर्व प्रक्रिया पूर्ण करून चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांची कार्यालयातील ट्रॅकवर चाचणी घेतली जात आहे. सार्वजनिक रस्त्याच्या नावाखाली मैदानांवर, निर्मनुष्य रस्त्यावर चाचणी घेतली जात असून, आरटीओ कार्यालयाने ड्रायव्हिंग स्कूलशी हातमिळविणी केल्याची ओरड नागरिकांतून होत आहे.

आरटीओ कार्यालयाने २८ फेब्रुवारी रोजी दुचाकी वगळता सर्व वाहनांच्या कायमस्वरूपी लायसन्ससाठी घेण्यात येणारी चाचणी कार्यालयाबाहेरील सार्वजनिक रस्त्यावर घेण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची महिनाभरापूर्वी अंमलबजावणी सुरू झाली. मात्र, कार्यालयाबाहेर फक्त मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवारांची चाचणी घेतली जात आहे. मोटार ड्रायव्हिंग स्कूलव्यतिरिक्त लायसन्ससाठी येणाऱ्यांची कार्यालयातील ट्रॅकवर चाचणी घेतली जात आहे. यासाठी कार्यालयात एच आकाराचा आणि सरळ रस्त्याचा ट्रॅक आहे. त्यावर ही चाचणी द्यावी लागते. ही चाचणी देताना वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडताना दिसत आहे. ड्रायव्हिंग स्कूलच्या उमेदवाराची सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतली जात आहे; परंतु सार्वजनिक रस्त्याच्या नावाखाली रेल्वेस्टेशन, बीड बायपास, सिडको, वाल्मी परिसरातील मैदान आणि निर्मनुष्य रस्त्यावर चाचणी घेतली जात असल्याची ओरड नागरिकांतून होत आहे. एकाच चाचणीसाठी वेगवेगळी चाचणी पद्धत घेण्यामागे शंका उपस्थित केली जात आहे. राज्यात अशी चाचणी पद्धत कुठेच नसून, सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतलेल्यांची कार्यालयातील ट्रॅकवर पुन्हा चाचणी घेतली, तर ९० टक्के उमेदवार नापास होतील, असा दावाही केला जात आहे.

शहरात आजघडीला ४५ वैध ड्रायव्हिंग स्कूल आहेत. कायमस्वरूपी लायसन्ससाठी दररोज ८० ते ९० जणांची चाचणी घेतली जाते. यामध्ये कार्यालयाबाहेर जवळपास ५० आणि कार्यालयात ३० जणांची चाचणी घेतली जात आहे. यामध्ये कार्यालयातील २० टक्के उमेदवार चाचणीत नापास होतात, तर कार्यालयाबाहेरील चाचणीतील नापास होणाऱ्यांचेही प्रमाण तेवढेच असल्याचा दावा आरटीओ अधिकाऱ्यांनी केला. 

नियमानुसार चाचणीड्रायव्हिंग स्कूलकडून येणारे उमेदवार हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे त्यांची सार्वजनिक रस्त्यावर चाचणी घेतली जाते. त्यांच्या बाजूला निरीक्षक बसलेले असतात. इतरांची चाचणी ही कार्यालयात घेतली जाते. ही सर्व प्रक्रिया नियमानुसार होत आहे. मैदानावर चाचणी घेतली जात नाही. तसे होत असल्याचे निदर्शनास आले, तर संबंधित निरीक्षकावर कारवाई केली जाईल. - स्वप्नील माने,सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी

निर्णयाची अंमलबजावणीआरटीओ कार्यालयाने घेतलेल्या निर्णयाची मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांकडून अंमलबजावणी केली जात आहे. स्वत:हून सर्व प्रक्रिया पूर्ण करून चाचणीसाठी येणाऱ्या नागरिकांनी मागणी केली, तर त्यांचीही चाचणी सार्वजनिक रस्त्यावर घेतली जाऊ शकते. स्कूलच्या प्रशिक्षणार्थींची मैदानावर चाचणी घेतली जात नाही आणि कोणाशीही कोणतीही हातमिळविणी झालेली नाही. - देवेंद्र पांडे,अध्यक्ष, मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादroad safetyरस्ते सुरक्षा