शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

पाणंदमुक्तीसाठी लोकसहभाग चळवळ

By admin | Updated: May 7, 2017 00:02 IST

गेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई नगर पालिकेचे ८७ टक्के काम वर्षभरात पूर्ण करण्याची किमया सीओ भागवत बिघोत यांनी करून दाखवली आहे. शासन योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकणार नाही हे लक्षात घेऊन गेवराईतील प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन बिघोत यांनी जून २०१६ मध्ये काम सुरू केले.गेवराई शहराची लोकसंख्या ३५ हजाराच्या आसपास आहे. जून २०१६ ला भागवत बिघोत यांनी गेवराई नगरपालिकेचा सीओ पदाचा पदभार स्वीकारला. बिघोत यांनी परभणी विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतले आहे. पूर्वी त्यांनी फौजदार म्हणूनही काम केलेले आहे. समन्वय साधत काम करण्याची त्यांची हातोटी आहे. फौजदारपदाचा राजीनामा देऊन त्यांनी गेवराई येथे ते सीओ म्हणून रुजू झाले. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत गेवराई शहरामध्ये २१६० शौचालये बांधण्याचे त्यांना उद्दिष्ट दिले होते. गेवराई शहराला पाणंदमुक्त करण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर होते. सुरूवातीला त्यांनी कर्मचारी व नगरसेवक यांच्याशी समन्वय साधत शहरातील प्रत्येक कुटुंबाच्या घरी जाऊन भेटी दिल्या. नागरिकांशी चर्चा करून शौचालयाचे महत्त्व पटवून दिले. बिघोत व त्यांचे कर्मचारी दररोजी सकाळी दोन तास शहराचा फेरफटका मारत. उघड्यावर प्रात:र्विधी करणाऱ्यांना शौचालयाचे महत्त्व पटवून देत बांधण्यासाठी प्रोत्साहित करीत असत. पाहता पाहता त्यांनी गेवराई शहरात केवळ एका वर्षात १८८० शौचालयांचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. उर्वरित २८० शौचालयांचे काम प्रगतीपथावर असून, जून अखेरपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.लोकसहभागाबद्दल विचारले असता ते म्हणाले, शासनाची योजना लोकसहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे काम करताना लोकांचा व लोकप्रतिनिधींचा विश्वास संपादन करणे हेच महत्त्वाचे आहे. त्याशिवाय कामे मार्गी लागत नाहीत.