शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
2
Russia Ukrain War : डोनाल्ड ट्रम्प युक्रेनचे दोन तुकडे करणार? क्रिमिया अन् दोन मोठी शहरे रशियाला मिळणार
3
तरुण वयात ₹१०० ची बचत वृद्धापकाळात देऊ शकते ३ कोटींची रक्कम; SIP मध्ये गुंतवणुकीसाठी वापरू शकता 'हा' फॉर्म्युला
4
Mumbai Local: मुंबईत मुसळधार पाऊस! हार्बर आणि मध्य मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत
5
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
6
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
7
परळी हादरलं! लग्नावरून परतताना जीप पुरात वाहून गेली; तिघे बचावले, एकाचा मृत्यू
8
School Holiday: मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
9
Video: टोलनाक्यावरील कर्मचारी की गुंड; लष्कराच्या जवानावर तुटून पडले, खांबाला बांधून दांडक्याने मारले
10
चेकच्या मागच्या बाजूला सही का करतात? ९०% लोकांना या प्रश्नाचे उत्तर माहित नसणार
11
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
12
Technology: ATM मधून पैसे काढल्यानंतर तुमचा PIN सुरक्षित राहतो का? 'अशी' घ्या काळजी!
13
Asia Cup India Squad : गंभीरनं 'फिल्डिंग' लावली तर गिल खेळणार; नाहीतर... आगरकर हे ३ मोठे निर्णय घेणार?
14
धक्कादायक! रणथंभोर व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांची गाडी अचानक पडली बंद आणि मग...
15
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
16
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
17
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
18
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
19
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
20
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल

लोकांना बदल हवा होता; विजयानंतर इम्तियाज जलील यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 15:08 IST

शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता.

ठळक मुद्दे चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

औरंगाबाद : ‘लोकांना बदल हवा होता’अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपल्या विजयानंतर इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. मतमोजणीच्या शेवटच्या टप्प्यात तर जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्यातला सामना चांगलाच रंगला होता. क्षणाक्षणाला उत्सुकता ताणली जात होती. जो जिंकून येईल, तो थोड्या मतांनी, हे स्पष्ट झाले होते. पहिल्या फेरीपासून आधी तिसऱ्या क्रमांकावर  फेकले गेलेले आणि नंतर दुसऱ्या क्रमांकावर आलेले चंद्रकांत खैरे यांनी २१ व्या फेरीनंतर पाच हजार मतांनी जलील यांना मागे टाकले आणि शिवसेनेच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. नंतर मात्र जलील हे मताधिक्य घेत राहिले आणि शेवटी ते विजयी झाले. 

इम्तियाज जलील हे पत्रकारितेतून राजकारणात आलेले आहेत. २०१४ साली पहिल्यांदाच त्यांनी औरंगाबाद मध्यची निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. आता त्यांनी पहिल्यांदाच खासदारकी लढवली आणि विजयी झाले. त्यांनी सांगितले की, औरंगाबादच्या प्रश्नांची मला चांगली जाण आहे. कचऱ्याचे शहर ही औरंगाबादची प्रतिमा मला बदलायची आहे. मागच्या २०-२५ वर्षांपासून शहराच्या विकासाला ब्रेक लागला आहे. आशिया खंडात सर्वाधिक प्रगतीचे शहर म्हणून औरंगाबादची प्रतिमा होती. सर्व नागरिकांना सोबत घेऊन मतदारसंघातले प्रश्न सोडवण्याचे व शहराला प्रगतिपथावर नेण्याचे काम मला करावयाचे आहे. 

आमदार म्हणून काम करताना जलील यांनी विधानसभेत अनेक प्रश्न मांडले. शहरवासीयांना आरोग्याच्या सुविधा मिळाव्यात यावर त्यांचा भर राहिला. आता त्यांना मनपाच्या कामांत लक्ष घालत इथले, औद्योगिकीकरण, बेरोजगारांचे प्रश्न, विमान, रेल्वेविषयक सुविधांमध्ये वाढ, समांतर जलवाहिनीचा अत्यंत गाजलेला प्रश्न यांना प्राधान्य द्यावयाचे आहे. 

५ कारणे विजयाची- दलित-मुस्लिम एकगठ्ठा मतांच्या जादूचा एमआयएमला लाभ. - अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांनी घडविले खैरेंच्या मताचे विभाजन.- ग्रामीण व शहरी  भागातील मतदानही काँग्रेसला मिळवता आले नाही.- शहरातील नागरी समस्यांमुळे खैरेंना विरोध. चार टर्ममुळे आली अ‍ॅन्टीइन्कम्बन्सी- शिवसेनेच्या मतविभाजनामुळे एमआयएम एकतर्फी जिंकले. 

टॅग्स :aurangabad-pcऔरंगाबादLok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Imtiaz Jalilइम्तियाज जलील