शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
3
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
4
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
5
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
6
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
7
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
8
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
9
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
10
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
11
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
12
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
13
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
14
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
15
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
16
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
17
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
18
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
19
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
20
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं

पक्ष बदलणाऱ्यांचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखते

By admin | Updated: September 20, 2014 00:04 IST

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे.

नांदेड : काँग्रेसमधून गेलेले लोक काँग्रेसलाच जिरवण्याची भाषा करीत आहेत. ज्या पक्षाने भरभरुन दिले त्याच पक्षाच्या विरुद्ध पराभूतांनी मोट बांधली आहे. अशा दलबदलूंचे ‘कर्तृत्व’ जनता ओळखून आहे, अशी उपरोधिक टीका करीत माजी मुख्यमंत्री खा. अशोकराव चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, हे दाखून द्या, असे आवाहन केले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने ओम गार्डन येथे काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. खा. चव्हाण म्हणाले, जनतेत पत असेल तर मते पडतात. ज्यांची पतच नाही त्यांना मत कसे पडेल. अशांना जनतेनेच बाजूला केले. त्याला अशोकराव चव्हाण जबाबदार नाहीत. जे पक्ष सोडून गेले ते बरे झाले. नव्यांना संधी मिळेल. जे चांगले काम करतील ते पुढे येतील. ५० वर्षे मेहनत घेवून तयार केलेले घर शाबूत ठेवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे. मतांची विभागणी करण्याची खेळी भाजपा-शिवसेनेकडून होत आहे. त्यातूनच वेगवेगळ्या पक्षाचे लोक उभे केले जातील. तोच उद्योग मला पराभूत करण्यासाठी केला होता. परंतु नांदेडच्या जनतेने विकासाच्या बाजुने कौल दिला. विधानसभा २००९ च्या विजयाची पुनरावृत्ती करा. कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसचा झेंडा राज्यात फडकला पाहिजे. त्याची सुरवात नांदेडमधून करा, असे आवाहन करीत खा. चव्हाण म्हणाले, अच्छे दिन कोणाचे आले, जनतेचे नव्हे त्यांचे आले. भाजपाकडून राजकीय दहशतवाद सुरू आहे. त्यांच्याच पक्षातील लोकांवर बंधने लादली जात आहेत. त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांवर किती गुन्हे दाखल आहेत हे आधी जनतेला सांगा, नंतर आमच्यावर आरोप करा. धर्मा-धर्मात, जाती-जातीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न धर्मांध शक्ती करीत आहेत. शिर्डीचे साईबाबा देव नाहीत, असा ठराव विहिंपच्या धर्मसभेत ठराव घेण्यात आला. यातून हिंदू-हिंदुमध्ये भांडणे लावून देण्याचा उद्योग आहे. परंतु जनता हे उद्योग ओळखते. त्यांना महाराष्ट्रात योग्य धडा मिळेल आणि त्याची सुरूवात नांदेडमध्ये होईल, असा विश्वासही माजी मुख्यमंत्री खा. चव्हाण यांनी व्यक्त केला. एका विचाराने चाललो म्हणूनच विकासाची कामे दिसत आहेत. येणारा काळ सर्वसामान्यांसाठी सुरक्षित राहिला पाहिजे. यासाठी काँग्रेसला विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.पालकमंत्री डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा यांचीही भाषणे झाली. मंचावर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महापौर अब्दुल सत्तार, उपमहापौर आनंद चव्हाण, मोतीराम पाटील, सभापती भुक्तरे, नगरसेवक विनय गिरडे पाटील, नवल पोकर्णा, सुमती व्याहाळकर, अनिता इंगोले, मंगलताई निमकर, सुषमा गहेरवार, शमीम बेगम, विजय येवनकर, व्यंकट मुदिराज , संगीता पाटील डक, प्रफुल्ल सावंत आदींसह जि. प., पं. स. सदस्य, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)