शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

अपुऱ्या निधीमुळे वेतन रखडले

By admin | Updated: June 22, 2014 00:25 IST

औंढा नागनाथ : तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही.

औंढा नागनाथ : तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचे एप्रिल व मे महिन्याचे वेतन अजून मिळालेले नाही. त्यामुळे नाराजी पसरली असून या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये शिक्षकांनी घेतला आहे.या संदर्भात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा प्रवक्ता इर्शाद पठाण यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष शाम माने, सचिव शेषराव बांगर, किरण राठोड, विलास सुरवसे, चंद्रकांत सुर्यवंशी, परसराम बर्गे, पृथ्वीराज कदम आदी उपस्थित होते. दोन दिवसांत वेतन न झाल्यास प्राथमिक शिक्षक संघातर्फे आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. एप्रिल महिन्याच्या वेतनासाठी २ कोटी १६ लाखाच्या निधीची आवश्यकता असताना केवळ १ कोटीची रक्कम मिळाल्याने आठ केंद्रांतर्गत येणाऱ्या शिक्षकांचेच वेतन अदा करण्यात आले. उर्वरित सात केंद्रांचे एप्रिल महिन्याचे वेतन जून संपत आला तरी अद्याप झालेले नाही. त्यामुळे शिक्षक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. तसेच मे महिन्याच्या वेतनासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर निधीच वितरीत करण्यात आलेला नाही. या संबंधी गटशिक्षणाधिकारी प्रकाश शिकारे यांच्या सोबत शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून एप्रिल व मे महिन्याचे वेतन अदा करण्याची मागणी केली. औंढा तालुक्याचे शालार्थ प्रणालीचे काम पुर्ण झाले असून केवळ जिल्हास्तरावरून वेतनासाठी निधी उपलब्ध न झाल्यामुळे वेतन अदा करण्यासंबंधी त्यांनी असमर्थता दर्शविली. जिल्हास्तरावरून निधी प्राप्त होताच तालुक्यातील सात केंद्रांतर्गत येणाऱ्या उर्वरित शिक्षकांचे वेतन तातडीने देण्यात येईल, असे आश्वासनही गटशिक्षणाधिकारी शिकारे यांनी शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. तालुक्यातील शिक्षकांचे वेतन न झाल्यामुळे मुलांचे शैक्षणिक प्रवेश, बँका- पतसंस्था यांच्या कर्जाचे हप्ते थकल्याने शिक्षकांची आर्थिक कोंडी झाली आहे. येत्या दोन दिवसांत प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेवून शिक्षकांचे वेतन त्वरीत देण्याची व्यवस्था करावी, अन्यथा पंचायत समिती कार्यालयात गटविकास अधिकाऱ्यांच्या दालनासमोर बैठा सत्याग्रह करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. (वार्ताहर)