शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

‘ई-पॉस’ योजनेला ‘पॉझ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 02:00 IST

मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मराठवाड्यातील गोरगरिबांच्या हक्काच्या धान्यावर डल्ला मारणा-यांना आळा बसवण्यासाठी शासनाने प्रत्येक रेशन दुकानांवर ईपीओएस (इलेक्ट्रॉनिक पॉइंट आॅफ सेल) मशीन बसविल्या; परंतु या योजनेला खीळ बसल्याची ओरड होत आहे. ईपीओएसच्या माध्यमातून अर्ध्याच कार्डधारकांना रेशन वाटप करण्यात येत असल्याने धान्याचा काळाबाजार रोखण्याचे आव्हान पुरवठा विभागासमोर आहे.धान्याचा काळाबाजार रोखण्यासाठी आॅक्टोबर महिन्याअखेर १६ हजार १८१ पैकी १३ हजार ८४९ रेशन दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आल्या. यापैकी २ हजार ४४४ मशीन बंद असून, उर्वरित ११ हजार ४०५ मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात येते.विविध योजनांचे ३९ लाख ४५ हजार ८१९ रेशनकार्डधारक असून, यापैकी आॅक्टोबर महिन्यात २२ लाख ३३ हजार ३०४ कार्डधारकांनाच ई-पॉस मशीनद्वारे धान्याचे वाटप करण्यात आले. विभागात सर्वत्र ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत धान्य वाटप झाल्याचा दावा प्रशासन करते.विभागात अद्याप १७ लाख कार्डधारकांना जुन्याच पद्धतीने धान्य वाटप करण्यात येते, मग ई-पॉस मशीनचा उपयोग काय, असा प्रश्न पुढे येतो आहे. फेब्रुवारी महिन्यात रेशन दुकानांवर ई-पॉस मशीन बसविण्याचे काम हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात लातूर व नांदेड, दुसºया टप्प्यात जालना, उस्मानाबाद व हिंगोली व तिसºया व अंतिम टप्प्यामध्ये औरंगाबाद, बीड आणि परभणी जिल्ह्यांतील सर्व रेशन दुकानांवर या मशीन बसविण्यात आल्या होत्या.