शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्याला एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणी

By admin | Updated: August 24, 2014 01:49 IST

शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर पाटोदा ग्रामपंचायतीने गावात एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन रुपयांत ग्रामस्थांना १० लिटर शुद्ध पाणी मिळेल.

शेख महेमूद तमीज, वाळूज महानगरराष्ट्रपती पुरस्कारप्राप्त पाटोदा ग्रामपंचायतीने गावात एटीएम कार्डद्वारे शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. अवघ्या तीन रुपयांत ग्रामस्थांना १० लिटर शुद्ध पाणी मिळेल.पाटोदा ग्रामपंचायतीने नियमितपणे कर भरणाऱ्या नागरिकांना मोफत दळण, आगाऊ कर भरणाऱ्या नागरिकांना संसारोपयोगी साहित्याची भेट, गरोदर मातांसाठी मदर केअर सेंटर, गुटखाबंदी इ. उपक्रम राबविले आहेत. या ठिकाणी राबविण्यात येणारे कल्याणकारी उपक्रम राज्यभर राबविण्याचा मनोदय ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील अनेक कारखाने घातक रसायनमिश्रित सांडपाणी उघड्यावर सोडत असल्यामुळे या परिसरातील जलस्रोत दूषित झाले आहेत. परिणामी, बोअर, विहिरी व हातपंपाचे पाणी दूषित झाले असून दूषित पाण्यामुळे या भागातील नागरिकांना कावीळ, गॅस्ट्रो आदी आजारांचा कायम सामना करावा लागतो.ग्रामपंचायतींनी एमआयडीसीकडून पाणी घेऊन गावात पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, एमआयडीसीच्या पाण्याचा दर जास्त असल्यामुळे पाटोदा ग्रामपंचायतीने गावात नाममात्र दरात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी गतवर्षी बीओटी तत्त्वावर जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू केला होता. या केंद्रावरून ८ रुपयांत २० लिटर पाणी पुरविण्यात येत होते. मात्र, हा दरही सर्वसामान्यांना परवडणारा नसल्यामुळे एटीएम केंद्राद्वारे नाममात्र दराने पाणीपुरवठा करण्याचा संकल्प माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी व पदाधिकाऱ्यांनी केला.