शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

रिक्त पदांचा रुग्णांना ‘ताप’

By admin | Updated: June 18, 2016 00:41 IST

बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालायात वैद्यकीय अधीक्षकांची जागा सहा महिन्यांपासून व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा वीस दिवसांपासून रिक्त असल्यामुळे

बदनापूर : येथील ग्रामीण रुग्णालायात वैद्यकीय अधीक्षकांची जागा सहा महिन्यांपासून व दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जागा वीस दिवसांपासून रिक्त असल्यामुळे रुग्णांवर उपचार होईनासे झाले आहेत. या रिक्त पदांचा ‘ताप’ रुग्णांना होत आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बदनापूर ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांच्या रिक्त पदांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत आहे. रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक गेल्या सहा महिन्यांपूर्वी सेवानिवृत्त झाले, तेव्हापासून हे पद रिक्त आहे. जालना येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे यांच्याकडे तात्पुरता पदभार देण्यात आला आहे. त्यांच्याकडे जालना येथील कामकाज असल्यामुळे येथे अद्यापही आले नाहीत. पुर्णवेळ अधिकारी नसल्याने रुग्णालयातील दैनंदिन कामकाज व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यावर विपरीत परिणाम होत आहे. येथील कामकाजावर नियंत्रण नसल्यामुळे हे रुग्णालयच ‘आजारी’ पडले आहे. याकडे वेळीच लक्ष देऊन रुग्णांचे हाल थांबवावेत, अशी मागणी होत आहे.दरम्यान, या रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांपैकी दोन जागा रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवेवर याचा परिणाम होत आहे. हे रुग्णालय बदनापूरपासून चार किमी अंतरावर असल्यामुळे रुग्णांना ३० ते ४० रू खर्चुन येथे उपचारासाठी यावे लागते. परंतु येथे डॉक्टरच राहत नसल्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना खाजगी डॉक्टरांकडे जावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. याविषयी प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पंडीत म्हणाले की, डॉक्टरांच्या रिक्त जागांबाबत आरोग्य उपसंचालक व जिल्हा शल्य चिकीत्सकांना अहवाल दिला आहे. रुग्णांचे हाल होणार नाहीत, याची काळजी घेतली जात आहे. लवकरच रिक्त पदे भरण्यात येतील. (वार्ताहर)