शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड येथील रुग्णालयातून भरदिवसा नवजात बालिकेस पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 00:30 IST

येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सदर आरोपी महिलेला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ठळक मुद्देसिल्लोड : सीसीटीव्ही बंद; रुग्णांची सुरक्षा वा-यावर

लोकमत न्यूज नेटवर्कसिल्लोड : येथील उपजिल्हा रुग्णालयातून भरदिवसा बुरखाधारी महिलेने एक दिवसाची नवजात बालिका पळविल्याची घटना बुधवारी (दि.३१) दुपारी पाच वाजेदरम्यान घडली. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. विशेष म्हणजे रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्यामुळे सदर आरोपी महिलेला पकडणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, भोकरदन तालुक्यातील नळणी येथील आसमाबी शेख आसेफ (२६) या महिलेने मंगळवारी (दि.३०) रात्री १ वाजता सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलीला जन्म दिला. दरम्यान, बुधवारी (दि.३१) दुपारी आसमाबी आईसह रुग्णालयात बसल्या असता तिथे एक अनोळखी बुरखादारी महिला आली व माझा गर्भपात झाला असल्याचे सांगितले. यावेळी दोघींनीही अनोळखी महिलेला धीर दिला. दरम्यान, आसमाबी व त्यांची आई लघुशंकेसाठी गेल्या असता ही संधी साधून बुरखाधारी महिला नवजात बालिका घेऊन पसार झाली. आसमाबी व त्यांची आई परत आल्या असता त्यांना बालिका दिसून आली नाही. त्यामुळे आरडा-ओरड केली असता मोठी गर्दी झाली. नागरिकांनी आजूबाजूला शोध घेतला असता बालिका आढळून आली नाही. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोउनि. बजरंग कुठुंबरे हे रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी रुग्णालय परिसर पिंजून काढला. यानंतर शहरातील विविध ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत सिल्लोड ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.कॅमेरे शोभेची वस्तू४उपजिल्हा रुग्णालयात सुरक्षेकरिता दीड वर्षापूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले; मात्र एक वर्षापासून बंद अवस्थेत असलेले कॅमेरे दुरुस्तीची कुणीही तसदी घेतली नाही. कॅमेरे दुरुस्तीबाबत अनेकदा वरिष्ठांकडे तक्रारी केल्या; मात्र दखल घेतली नाही, असे वैद्यकीय अधीक्षक सपकाळ यांनी सांगितले.