शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रुग्ण देतात ना पैसे, मग टाका खिशात; नि:शुल्क सेवेची कल्पना न देता रुग्णांकडून पैशांची आकारणी

By संतोष हिरेमठ | Updated: August 30, 2023 19:38 IST

छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रकार

छत्रपती संभाजीनगर : जिल्हा सामान्य रुग्णालयात १५ ऑगस्टपासून नि:शुल्क रुग्णसेवेला सुरुवात झाली. मात्र, अद्यापही याची अनेक रुग्णांना, नातेवाइकांना कल्पनाच नाही. त्यामुळे ओपीडीत नोंदणी शुल्कासाठी अनेकजण पैसे पुढे करतात. हे पैसे नाकारून नि:शुल्क रुग्णसेवेची माहिती देण्याऐवजी पैसे आकारण्याचा प्रकार जिल्हा रुग्णालयात सुरू आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांत मोफत उपचार सुरू केले आहेत. ईसीजी, एक्स-रे, सीटी स्कॅनसारख्या तपासण्याही मोफत होत आहेत. जिल्हा रुग्णालयात ओपीडीत तपासणी करण्यासाठी पूर्वी १० रुपये नोंदणी शुल्क होते. नोंदणी केल्यानंतरच रुग्णांना संबंधित डाॅक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेता येते. नि:शुल्क तपासणीला सुरुवात झाल्यानंतरही पैसे घेण्यात येत असल्याच्या तक्रारी ‘लोकमत’ला प्राप्त झाल्या. यासंदर्भात ‘लोकमत’ने पडताळणी केली. तेव्हा काही जणांकडून पैसे आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. पैसे देणाऱ्यांना नि:शुल्क रुग्णसेवेविषयी कल्पनाच नसल्याचेही दिसून आले.

खेळाडूकडूनही वसुलीविविध क्रीडा स्पर्धांसाठी जाणाऱ्या खेळाडूंकडून तपासणी शुल्क आकारण्यात येत असल्याचे दिसून आले. एकत्रित आलेल्या ६ खेळांडूकडून ६० रुपये आकारण्यात आले. रुग्णांना नि:शुल्क सेवा आहे. पण, खेळांडूबाबत स्पष्ट आदेशच नसल्याचे सांगितले जात आहे.

दर्शनी भागात फलक का नाही?नि:शुल्क सेवेसंदर्भात दर्शनी भागात फलक लावण्याची सूचना करण्यात आलेली आहे. मात्र, जिल्हा रुग्णालयात अद्यापही हा फलक लावलेला नाही. शुल्क घेताना आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाईचेही आदेश आहेत.

ज्यांना माहिती ते पैसे देत नाहीनि:शुल्क रुग्णसेवेविषयी ज्यांना माहिती आहे, ते पैसे देत नाहीत. रांगेत उभे असताना अनेकजण हातात पैसे घेऊन असतात. चर्चेतून रुग्णालयात मोफत सुविधा असल्याची माहिती मिळते आणि रुग्ण हातातील पैसे स्वत:च्या खिशात टाकतात. अनेक रुग्णांनी रुग्णालयात मोफत उपचार मिळाल्याचेही सांगितले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलAurangabadऔरंगाबाद