शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : स्वच्छतागृहात कोरोना रुग्ण कोसळला; दरवाजा तोडून काढले बाहेर, पण दुर्दैवाने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 13:00 IST

corona virus in Aurangabad : गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालयात झालेल्या या घटनेत कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोपया प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे

औरंगाबाद : ऑक्सिजनवर असलेला कोरोना रुग्ण स्वच्छतागृहात गेला. मात्र, अचानक स्वच्छतागृहातच रुग्णाची प्रकृती खालावली. बराच वेळ झाल्यानंतरही रुग्ण बाहेर आला नसल्याचे लक्षात येताच दरवाजा तोडून रुग्णाला बाहेर काढून आयसीयूत हलविण्यात आले. मात्र, दुर्दैवाने रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी पहाटे जिल्हा सामान्य रुग्णालयात घडली. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

गुलाबराव ढवळे (६५, रा. जयभवानीनगर) असे मयत रुग्णाचे नाव आहे. कोरोनाच्या उपचारासाठी त्यांना २७ मार्च रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल होतानाच ऑक्सिजनची पातळी कमी होती. त्यामुळे ते ऑक्सिजनवर होते. दरम्यान सोमवारी पहाटे ते स्वच्छतागृहात गेले. त्यांना स्वच्छतागृहात जाऊन खूप वेळ झाला, तरीही ते बाहेर आले नसल्याची बाब अन्य रुग्ण, कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा वाजविला. परंतु आतून काहीही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. परंतु सकाळी ७.४० वाजता गुलाबराव ढवळे यांचा मृत्यू झाला. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही दुर्दैवी घटना घडली असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी दोषी असलेल्या कर्मचाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्यांना निलंबित करावे, अशी मागणी रुग्णाचा मुलगा निलेश ढवळे यांनी केली आहे.

उपचारादम्यान मृत्यूसदर रुग्ण पहाटे ५.३० वाजता स्वच्छतागृहाला गेला होता. पण आतमध्ये गेल्यानंतर सकाळी ६ वाजेपर्यंतही ते बाहेर आले नाही. ही बाब लक्षात येताच दार तोडून त्यांना बाहेर काढले. तेव्हा आधारासह खाटेपर्यंत ते चालत आले. त्यांच्यावर आयसीयूत तात्काळ उपचार करण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यांना व्हेंटिलेटरही लावण्यात आले. पण त्यांचा मृत्यू झाला.- डाॅ. सुंदर कुलकर्णी, जिल्हा शल्यचिकित्सक 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद