शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

प्रधान सचिवांकडून पाटोदा, जोगेश्वरीची अचानक पाहणी

By admin | Updated: June 23, 2014 00:33 IST

वाळूज महानगर : राज्याचे प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी कुणालाही थांगपत्ता न लागू देता सूर्योदयापूर्वीच पाटोदा व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन स्वच्छता व विकासकामांचा आढावा घेतला.

वाळूज महानगर : राज्याचे प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी कुणालाही थांगपत्ता न लागू देता सूर्योदयापूर्वीच पाटोदा व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन स्वच्छता व विकासकामांचा आढावा घेतला. अचानक भेटी दिल्यामुळे सरपंच, अधिकारी व ग्रामस्थांची चांगलीच धांदल उडाली.आयएसओ मानांकनप्राप्त पाटोदा, जोगेश्वरी गावातील कामकाजाची माहिती घेण्यासाठी प्रधान सचिव एस. एस. संधू यांनी जि. प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव साळुंके, स्वच्छता अभियानचे तालुका समन्वयक एम. ए. पठाण यांना सोबत घेऊन भल्या पहाटे गावांना अचानक भेट देऊन पाहणी केली. राष्ट्रपती पुरस्कारासह विविध पुरस्कारप्राप्त गावातील स्वच्छता अभियान तसेच विविध विकासकामांचा आढावा घेऊन त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थ स्वच्छतागृहाचा वापर करतात किंवा नाही याचीही चौकशी करून गावात फेरफटका मारला. यावेळी संधू यांनी जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. पाहणी केल्यानंतर त्यांनी समाधान व्यक्त करून गावाचे काम इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. गावाचे प्रेरणास्त्रोत भास्करराव पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, ग्रामविकास अधिकारी आर. डी. चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांचे एस. एस. संधू यांनी अभिनंदन करून व्हिजीट बुकमध्ये अभिप्राय लिहून अशाच प्रकारचे कार्य राज्यभर राबविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पाटोदा गावाला भेट दिल्यानंतर संधू यांनी लगेच नायगाव-बकवालनगर व जोगेश्वरी या गावांना भेटी देऊन पाहणी केली. प्रधान सचिव संधू यांनी गावातील अंतर्गत रस्ते, स्वच्छता, अंगणवाड्या, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय आदींना भेटी देऊन या गावातील विकासकामांची प्रशंसा केली. यावेळी सरपंच योगेश दळवी, ग्रामविकास अधिकारी प्रकाश तुपे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर निळ, गटविकास अधिकारी विजय परदेशी, संजय दुबिले, तारा खोचे, प्रकाश साबळे, सूर्यभान काजळे, शिवाजी दुबिले, राजेंद्र त्रिभुवन, कपूरचंद काबरा, नारायण काजळे, कल्याण पेरे, मुरलीधर पेरे, भागचंद पेरे, दीपाली पाटेकर, अशफाक बेग आदींसह दोन्ही गावातील ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.संधू यांनी कुठलीही पूर्वसूचना न देता दोन्ही ग्रामपंचायतीला भेटी देऊन पाहणी केली. भल्या सकाळीच प्रधान सचिव गावात आल्यामुळे राजकीय मंडळींसह अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली होती.