बीड : येथील पतंजली योग समितीच्या वतीने शहरवासियांच्या स्वास्थ्यासाठी मागील दोन वर्षांपासून मॅरेथॉन शिबिराचे आयोजन केले जाते. यावर्षी १०१ दिवसांचे शिबीर सुरू असून, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.महिला दिनी सुरू झालेले हे शिबीर शहरातील विविध प्रभागांत दहा दिवस घेण्यात येते. २१ जून पर्यंत हे शिबीर चालणार असून, त्यामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून योग शिक्षक मार्गदर्शनासाठी येत आहेत.काकू-नाना प्रतिष्ठान व पतंजली योग समितीच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या विक्रमी योग शिबिराचा शहरवासियांना आता लळा लागला आहे. ताणतणाव, धावपळ, अवेळी खाणे, व्यसनाधिनता या जीवनशैलीमुळे अनेक विकार जडण्याची शक्यता असते. योग प्राणायामामुळे निरोगी शरीर बनण्यास मदत होते. शिवाय ताणतणावातून मुक्ती मिळते. स्थूलतेवरही मात करून हलक्याफुलक्या शरीराचा आनंद घेता येऊ शकतो. त्यामुळे योगगुरू रामदेव बाबा यांनी उपलब्ध करून दिलेल्या योगधड्याचा प्रत्येकाने अंगीकार करून नित्य योग, प्राणायाम करावेत, असे आवाहन युवा भारतचे प्रांत प्रभारी अॅड. श्रीराम लाखे यांनी केले आहे. पंतजलीचे शिबीर दहा दिवस वेगवेगळ्या प्रभागात पोहचणार असून, संपूर्ण शहरात योग दिंडी नेली जाणार आहे. त्यामुळे या शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे. (प्रतिनिधी)
पतंजलीने लावला योगाचा लळा
By admin | Updated: April 7, 2016 00:33 IST