शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
2
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
3
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
4
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
5
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
6
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
7
अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
8
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
9
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
10
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
11
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
12
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
13
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
14
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
15
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
16
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
17
गणवेशावरून चिडवलं, घरी येताच चौथीत शिकणाऱ्या प्रशांतने...; आईवडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली
18
Meesho च्या शेअरला अपर सर्किट; इश्यू प्राईजच्या दुप्पट झाली किंमत, सह-संस्थापक बनले अब्जाधीश
19
ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला धमकी, सरकारने बांगलादेशी अधिकाऱ्याला समन्स बजावले
20
विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्याबद्दल अतीव आस्था, येथील गुणवत्तावाढीच्या कार्यात सदैव सोबत असेल: शरद पवार

By सुमेध उघडे | Updated: November 19, 2022 15:33 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात शरद पवार आणि नितीन गडकरी यांना डिलीट पदवीने सन्मानित करण्यात आले

औरंगाबाद: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये शैक्षणिक कामात प्रगती नसतांना येथे लक्ष घातले आणि मिलिंदच्या माध्यमातून शिक्षण दिले. महाराष्ट्राला अभिमान वाटावा असे हे विद्यापीठ आहे. याच्या निर्मितीपासूनचा कालखंड मला आठवतो. याच्या जडणघडणीत माझा समावेश होता याचा आनंद आहे. आज विद्यापीठाने डिलीट पदवी प्रदान केली यासाठी अंतकरणापासून आभारी आहे. नितीन गडकरी आणि माझ्या कामाची दखल घेतली गेली यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्या.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या ६२ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, या विद्यापीठाच्या स्थापनेत माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा मोठा वाटा आहे. या भागात विद्यापीठ स्थापन करण्याचा निर्णय नेतृत्वाने घेऊन संपूर्ण मराठवाड्याच्या शिक्षणाचे दालन खुले झाले. विद्यापीठासाठी संघर्ष झाला. याचा भागात आणखी एक विद्यापीठ स्थानक करण्याच्या प्रक्रियेत माझा सहभाग होता याचा आनंद आहे. यामुळे येथे शैक्षणिक दालन खुले झाले. 

उसावरील संशोधनासाठी जालन्यात केंद्रमराठवाड्याची शेती बदलत आहे. पहिले फक्त कापूस, बाजरी होती. आता ऊस उत्पादनात मराठवाडा राज्यात अग्रेसर आहे. देश पातळीवरील उसावर संशोधन करणाऱ्या संस्थेचे अध्यक्षपद माझ्याकडे आहे. याच माध्यमातून मराठवाड्यात उसाच्या शेतात क्रांती घडवणारी आणि तांत्रिक सुविधा देणारी संस्था सुरू करण्यासाठी जालना येथे 100 एकर जमीन खरेदी करून काम सुरू करतो आहे. त्यानंतर नितीन गडकरी यांच्या मदतीने नागपूर येथे या प्रकारचे केंद्र लवकरच सुरु होईल.

गुणवत्तावाढीसाठी सदैव सोबत मला शैक्षणिक संस्थानची काळजी वाटते. त्यामुळे दर्जा सुधारण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध करायचे असेल तर आपल्याला शैक्षणिक दर्जा सुधारावा लागेल. हे सर्व करण्यात सर्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अग्रेसर राहील, अशी अपेक्षा व्यक्त करतो.  आपण सर्व क्षेत्रात कसे आघाडीवर राहू याची काळजी घेऊ. आपल्यातील, मराठवाड्यासाठी अतीव आस्था असलेल्या सहकारी म्हणून गुणवत्ता वाढीसाठी कशी दोन पाऊले पुढे टाकू आणि यशस्वी होऊ या कार्यात सोबत राहील याचा विश्वास देतो, अशी ग्वाही देतो असेही शरद पवार म्हणाले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादSharad Pawarशरद पवार