परतूर : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी राज्यभर छावा संघटनेने हवाछोड आंदोलन केले. त्याचाच एक भाग म्हणून तालुका छावा संघटनेच्या वतीने हवा छोड आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता छावा संघटनेचे तालुका अध्यक्ष महेश नळगे यांच्या नेतृत्वाखाली रेल्वेस्टेशन चौकात छावाचे कार्यकर्ते एकत्र येऊन मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत तेथे असलेल्या दोन बसेसच्या हवा सोडून दिल्या. याच सुमारास पोलिसांची गाडीही तेथे आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या गाडीचीही हवा सोडून घोषणा दिली. पोलिसांनी समज देत कार्यकर्त्यांना पांगविले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी राज्यभरात छावातर्फे हवा छोड आंदोलन करण्याचा निर्णय झालेला होता त्याचाच एक भाग असल्याचे महेश नळगे यांनी सांगितले. आंदोलनात गणेश शेळके, महेश खरात, सतीश गायकवाड, मनोज धुमाळ, राहुल ढोबळे, राहूल ढोबळे, महेश ढोबळे, शाम नळगे, विष्णू कावळे, ज्ञानेश्वर भुतेकर, सुमित शर्मा, व महेश दाड आदी होते. (वार्ताहर)तीर्थपुरीत बस, शासकीय वाहनांना अडविलेतीर्थपुरी :अखिल भारतीय मराठा छावा युवा संघटनेच्या वतीने तीर्थपुरी येथे मराठा आरक्षणाबाबत शासकीय वाहनांचे हवा सोड आंदोलन झाले. यामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. निवडणुकीपूर्वी मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल, या शासनाच्या आश्वासनाच्या निषेधार्थ येथे छावाच्या कार्यकर्त्यांनी शासकीय वाहनांची हवा सोडली. बसस्थानका जवळ व कंडारी फाटा येथेही आंदोलन करण्यात आले. यावेळी विलास उढाण, गणेश पघळ, विलास कोल्हे, मच्छिंद्र घोगरे, कृष्णा खोजे, गजानन पघळ, ज्ञानेश्वर टाकसाळ, श्रीकृष्ण यशलोटे, राहुल खराबे, संजय बोबडे, विलास बोबडे, रामेश्वर मोरे, युवराज पघळ, शे.आयुब आदी होते.
परतूर, तीर्थपुरीत छावाचे हवा छोड आंदोलन
By admin | Updated: June 15, 2014 00:59 IST