शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांना मतविभाजनाची चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2017 00:10 IST

प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणधुमाळी रंगली आहे़ ८१ जागांसाठी होत असलेल्या या निवडणुकीसाठी तब्बल ५८१ उमेदवार रिंगणात आहेत़ विशेष म्हणजे, प्रमुख पक्षांसह २५३ अपक्षांनीही प्रचारात जोर लावल्याने बहुतांश प्रभागांमध्ये काट्याच्या लढती होण्याची चिन्हे असून प्रमुख उमेदवारांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे़मागील १९ वर्षांपासून नांदेड महानगरपालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे़ या निवडणुकीत विजय मिळवून सत्ता कायम राखण्याचे काँग्रेसपुढे आव्हान आहे़ तर केंद्रात व राज्यात असलेल्या सत्तेचा लाभ उठवित नांदेडचा गड काबीज करण्याचे मनसुबे भाजपाने आखले आहेत़राष्ट्रवादी आणि शिवसेनेसाठीही ही निवडणूक तशी अस्तित्वाचीच आहे़ या दोन्ही पक्षांचा भर मागील निवडणुकीत असलेले बलाबल टिकविण्याकडे असणार आहे़ चारही पक्ष निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जात आहेत़त्यातच २५३ अपक्ष उमेदवार रिंगणात असल्याने बहुतांश ठिकाणी तिरंगी तर अनेक ठिकाणी चौरंगी लढती होत असल्याचे चित्र आहे़ काँग्रेस सर्व ८१ जागांवर निवडणूक लढवित असून काँग्रेसपाठोपाठ भाजपाचे ८० उमेदवार आहेत़ भाजपाने सर्व ८१ जागांवर उमेदवार दिले होते़, परंतु अर्जाच्या छाननीमध्ये प्रभाग क्रमांक १२ ‘ड’ मधील उमेदवाराचा अर्ज अवैध ठरविला गेल्याने आता ८० जागांवरच भाजपाला आपले बळ आजमावावे लागणार आहे़ भाजपापाठोपाठ शिवसेना ७१ जागांवर उमेदवार देण्यात यशस्वी ठरली आहे़विशेष म्हणजे, मागील पाच वर्षांत शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे़ गत निवडणुकीत शिवसेनेने ४५ जागांवर उमेदवार दिले होते़ सेनेपाठोपाठ राष्ट्रवादी ५५ जागांवर नशीब आजमावत आहे़अनेक प्रभागांत राष्ट्रवादीला यंदा उमेदवार मिळाले नाहीत़ एआयएमआयएमने मागील वर्षी ११ जागांवर विजय खेचत राज्याच्या राजकारणात दमदार एन्ट्री केली होती़ एआयएमआयएमच्या या कामगिरीची राज्यभरात चर्चाही झाली़ मात्र मध्यंतरीच्या काळात एमआयएमच्या काही नगरसेवकांनी काँग्रेसच्या वळचणीला जाणे पसंत केल्याने या पक्षाने यावेळी बसपासोबत आघाडी करीत केवळ ३२ जागांवर उमेदवार दिले आहेत़ बसपा १७ जागांवर निवडणूक लढवित आहे़एकूणच प्रमुख पक्षांचा एकला चलो रे चा नारा आणि त्यातच अपक्षांची पडलेली भर यामुळे बहुतांश प्रभागांत चुरस अनुभवण्यास मिळत आहे़ कोण किती मते खेचतो याबरोबरच कोण कोणाची मते वजा करतो, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे़