शिरडशहापूर : वसमत तालुक्यातील वाई गोरखनाथ येथे पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी भरणाऱ्या महापोळ्यात मंगळवारी दिवसभरात ७० ते ८० हजार बैलजोड्या दाखल झाल्या. विदर्भासह संपूर्ण मराठवाड्यातून आपल्या बैलांना गोरखनाथाचे दर्शन घडविण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. यात्रेच्या पार्श्वभूमीवर होणारी विक्रमी गर्दी लक्षात घेऊन वसमत ते औंढा रस्त्यावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने ती वळवण्यात आली होती. पशुवैद्यकीय विभागांच्या वतीने बैलांच्या मोफत तपासणी व लसीकरणासाठी शिबीर घेण्यात आले. उद्घाटन सरपंच दुलबाराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष साहेबराव कदम, सचिव बाबुराव कदम, माजी सरपंच गुलाबराव कदम, तंटामुक्तीचे अध्यक्ष बालाजी मगर, गोविंदराव मगर, रावसाहेब निर्मल, माणिकराव कदम, सुलभाजी बोडखे, साहेबराव कुंभार, पशुधन विस्तार अधिकारी डॉ. मुस्तरे, डॉ. गड्डमवार, डॉ. झडते, डॉ. मुटकुळे, डॉ. गानमोटे, डॉ. सूर्यवंशी, डॉ. पूद्दलवार आदी उपस्थित होते. यामध्ये जवळपास ५०० बैलांना घटसर्प व फऱ्या रोगाची संयुक्त लस देण्यात आली. तसेच १२५-१५० बैलांवर औषधोपचार करण्यात आले. पाणीटंचाई असल्यामुळे दरवर्षी मारोतराव वसमतकर, उत्तम भोसले, अंबादासराव भोसले यांनी विनामुल्य टँकरने पाणीपुरवठा करत असतात. यात्रा कमेटीच्या वतीने २५ क्विंटल महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यासाठी पोनि नानासाहेब नागदरे, फौजदार कदम, फौजदार जोंधळे यांच्यासह ७० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. (वार्ताहर)केसापुरातही उत्साहहिंगोली : हिंगोली तालुक्यातील केसापूर येथील केशवराज महाराज मंदिरासमोर पोळा उत्साहात साजरा झाला. बैल एकाच तोरणाखाली उभे करून पूजा करण्यात आली. यावेळी गणेश शिंदे, परसराम शिंदे, श्रीराम शिंदे, भानुदास शिंदे, शामराव शिंदे, विठ्ठल शिंदे, किसन शिंदे, नामदेव शिंदे, रामेश्वर शिंदे, प्रल्हाद शिंदे, सरपंच केशव शिंदे, शंकर शिंदे, देविदास महाराज टेकाळे, संतोष टेकाळे, किसन टेकाळे उपस्थित होते.पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी येणाऱ्या करीला महापोळा म्हणजेच बैलाची यात्रा भरते. दर्शनासाठी मराठवाड्याच्या विविध भागातून बैलजोड्या येतात. पोळा आटोपल्यानंतर मध्यरात्रीनंतर शेतकरी आपापल्या बैलजोड्या घेऊन वाईकडे प्रयाण करतात. दरवर्षी किमान हजारो बैलजोड्या येथे दाखल होतात. गोरखनाथाचे दर्शन घेतल्याने वर्षभर ठणठणीत राहतात, अशी शेतकऱ्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे महाराष्ट्रात केवळ वसमत तालुक्यातच ही ऐतिहासिक बैलांची यात्रा (महापोळा उत्सव) भरविली जाते. ग्रामस्थांच्या वतीने यात्रा समिती स्थापन केली जाते. हा उत्सव शांततेत पार पाडण्याची जबाबदार या समितीची असते.
वाईत ८० हजार बैलजोड्यांचा सहभाग
By admin | Updated: August 26, 2014 23:56 IST