शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद जिल्ह्यात ‘माझी कन्या भाग्यश्री’कडे पालकांची पाठ; वर्षभरात अवघ्या आठ जणांनी घेतला लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 16:45 IST

दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत.

औरंगाबाद : दोन वर्षांपूर्वी अमलात आलेल्या ‘माझी कन्या भाग्यश्री’ या योजनेसाठी जिल्ह्यात लाभार्थीच मिळाले नाहीत. तथापि, गेल्या महिन्यात अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविकांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन एक किंवा दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणा-या पालकांचा शोध घेतला. त्यांना भेटून या योजनेबाबत समुपदेशन केले. तेव्हा कुठे दोन वर्षांत अवघी ८ कुटुंबे तयार झाली व त्यांना जि.प. महिला व बालकल्याण विभागाने या योजनेचा लाभ दिला. 

प्रामुख्याने मुलींचे शिक्षण व आरोग्यामध्ये सुधारणा करणे, त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे, बालिका भ्रूणहत्या रोखणे, मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे, बालविवाह रोखणे आणि मुलींचा जन्मदर वाढविणे या उद्देशाने राज्यात १३ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘सुकन्या’ योजना सुरू करण्यात आली होती. त्यानंतर १ एप्रिल २०१६ पासून ‘सुकन्या’ योजनेचे ‘माझी कन्या भाग्यश्री’ या नव्या योजनेत विलीनीकरण करण्यात आले. ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू झाल्यापासून तब्बल दीड वर्षे या योजनेला समाजातून प्रतिसादच मिळत नव्हता. त्यामुळे शासनाने १ आॅगस्ट २०१७ रोजी या योजनेचे निकष शिथिल केले. 

पूर्वीच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी दारिद्र्यरेषेखालील तसेच एक लाखापर्यंत वार्षिक उत्पन्न असणारी कुटुंबे पात्र ठरविण्यात येत होती. सुधारित योजनेत दारिद्र्यरेषेची अट काढून टाकण्यात आली असून, उत्पन्न मर्यादा साडेसात लाखांपर्यंत वाढविण्यात आली आहे. एका मुलीनंतर आई किंवा वडिलाने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर मुलीच्या नावे ५० हजार, तर दोन मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असेल, तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी २५ हजार रुपये बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येतात. या ठेवीवरील व्याज मुलीला वयाच्या सहाव्या आणि बाराव्या वर्षी काढता येईल. मुद्दल आणि व्याज दोन्ही रक्कम वयाच्या १८ व्या वर्षी काढता येईल. 

स्वातंत्र्यदिनी जाणार घरोघरीयासंदर्भात जि.प.चे महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले यांनी सांगितले की, ही योजना मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उपयुक्त आहे. मुलांएवढेच मुलींवर प्रेम करणारे अनेक आहेत. मुलीच्या जन्मानंतर पाळणा थांबविणारेही अनेक आहेत; पण समाजामध्ये एक किंवा दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेण्याची मानसिकता फारसी रुजलेली नाही. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी स्वातंत्र्यदिनी अंगणवाडीसेविका, मुख्यसेविका, बालविकास प्रकल्प अधिकारी हे घरोघरी जाऊन योजनेची माहिती देतील. प्रामुख्याने एक किंवा दोन मुलींवर शस्त्रक्रिया केलेल्या कुटुंबांची माहिती घेऊन त्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे.

टॅग्स :government schemeसरकारी योजनाAurangabad z pऔरंगाबाद जिल्हा परिषदState Governmentराज्य सरकार