शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
3
भारताविरोधातील कट उधळला! शोपियानात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
4
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
5
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
6
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
7
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
8
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
9
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...
10
बापमाणूस! पत्नीच्या मृत्यूनंतर चिमुकल्या लेकीला सोबत घेऊन बाबा करतोय काम, पाणावले डोळे
11
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
12
Meditation Tips: ध्यान करायचे आहे पण ध्यान लागत नाही? श्री श्री रविशंकरांनी सांगितले तीन नियम!
13
Online Admission Process : विद्यार्थ्यांनो आताच नोट करून ठेवा, 'या' तारखेपासून सुरू होणार अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 
14
"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."
15
राहुल गांधींना दिलासा; नागरिकत्वाला आव्हान देणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
16
बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...
17
BSE चं मार्केट कॅप १ लाख कोटींच्या पार, शेअरच्या किंमतीत विक्रमी तेजी
18
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
19
'या' बँका देत आहेत सर्वात स्वस्त गृहकर्ज; सरकारी बँकांसह खासगी बँकेचाही समावेश
20
"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

क्रॅश कोर्समध्ये पालकांनी मुलांना गुंतविले

By admin | Updated: May 15, 2015 00:50 IST

लातूर : मामाच्या गावाला जाणे आणि खेळात रमणे आता कमी झाले आहे़ संगणक आणि टीव्हीवर कार्टुन पाहण्यात मुले रमत आहेत़

लातूर : मामाच्या गावाला जाणे आणि खेळात रमणे आता कमी झाले आहे़ संगणक आणि टीव्हीवर कार्टुन पाहण्यात मुले रमत आहेत़ उन्हाळी सुट्ट्या असूनही मुलांना पालकांनी क्रॅश कोर्समध्ये बांधून ठेवले आहे़ १० वी व १२ वीच्या मुलांचे उन्हाळी वर्ग चालूच आहेत़ पण ४ थी ते ८ वी पर्यंतच्या मुलांनाही क्रॅश कोर्समध्ये गुंतविले आहे़ ६५ टक्के मुलांना उन्हाळी सुट्ट्यात कसलाही कोर्स नको आहे़ सुट्ट्याचा मनसोक्त आनंद घेऊ द्यावा, हे मुलांचे म्हणणे ‘लोकमत’ सर्व्हेक्षणातून समोर आले आहे़४ थी ते ८ वी पर्यंतच्या मुला-मुलींचा सुट्ट्या विषयी सर्व्हेक्षणाद्वारे कानोसा घेतला असता, शहरातील बहुतांश मुला-मुलींना वेगवेगळे कोर्स लावण्यात आले आहेत़ संगणक, स्पोकन क्लास व अन्य क्रॅश कोर्स लावण्यात आले आहेत़ त्यामुळे त्यांना मनसोक्तपणे सुट्ट्यांचा आनंद लुटता येत नाही़ सर्व्हेक्षणातील १०० पैकी ६५ मुला-मुलींनी सुट्ट्यांमध्ये कोर्स नको, टीव्हीवर कार्टुन पाहण्यास मुभा मिळावी, असे मत नोंदविले आहे़ क्रॅश कोर्सहून आल्यानंतर मिळालेल्या वेळेत मुलं कार्टुनचा आनंद लुटतात़फावल्या वेळेत कार्टुन पाहताना पालकांकडून विरोध होतो़ कार्टुनचे चॅनल लावण्याऐवजी रॅम्स चॅनल लावण्याची सूचना पालकांकडून होते़ रॅम्समधील पोयम, स्टोरी आम्ही शाळेत शिकली़ त्या पोयम व स्टोरी आम्हाला पाठ आहेत़ तरी पप्पांकडून रॅम्स चॅनल पाहण्याचा आग्रह होतो़ पोगो लावू दिला जात नाही, अशी तक्रारही मुलांनी केली़ ४सुट्ट्या लागल्यानंतर ५४ टक्के मुला-मुलींच्या आई-बाबांनी क्रॅश कोर्स लावल्याचे नियोजन केल्याचेही सर्व्हेक्षणातून निदर्शनास आले़ केवळ २६ टक्के मुलांच्या पालकांनी सुट्ट्याचा मुक्तपणे आनंद लुटू देण्यास हरकत घेतली नाही़ त्यामुळे ६५ टक्के मुलांनी कोर्समुळे व आई-बाबांच्या आग्रहामुळे आम्हाला सुट्टीचा आनंद लुटता येत नसल्याचेही गाऱ्हाणे मांडले़ ४५ वीच्या पुढील ५२ टक्के मुलांनी सुट्टी घालविण्यासाठी स्वत:चे मत तयार केले होते़ मात्र पालकांमुळे नियोजनाप्रमाणे सुट्टीचा आनंद घेता येत नसल्याचेही मत नोंदविले आहे़ क्रॅश कोर्सला जाताना कंटाळा येतो, अशी नाराजी व्यक्त केली़