शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

परभणीची ज्योती गवते, सैन्यदलाच्या दूधनाथ ठरले विजेते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 00:50 IST

दोन वर्षांपासून जबरदस्त सूर गवसलेल्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन ठरलेल्या परभणीच्या ज्योती गवतेने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटातील २५ कि. मी. अंतरात विजेतेपद पटकावले.

ठळक मुद्देऔरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन : २१ कि. मी.मध्ये भाग्ये, प्राजक्ता अव्वल स्थानी

औरंगाबाद : दोन वर्षांपासून जबरदस्त सूर गवसलेल्या आणि अनेक आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय मॅरेथॉनमध्ये चॅम्पियन ठरलेल्या परभणीच्या ज्योती गवतेने पुन्हा एकदा जबरदस्त कामगिरी करताना एमआयटी औरंगाबाद हेरिटेज हाफ मॅरेथॉनमध्ये महिला गटातील २५ कि. मी. अंतरात विजेतेपद पटकावले. पुरुष गटात सैन्य दलाचा दूधनाथ अव्वल आला. २१ कि. मी. गटात भाग्येश पाटील व प्राजक्ता गोडबोले यांनी अनुक्रमे पुरुष आणि महिला गटात अव्वल स्थान पटकावले, तर १0 कि. मी. मध्ये औरंगाबादच्या साई केंद्रातील खेळाडू नंदिनी पवार हिने महिला गटात, तर पुरुष गटात मोदावत हार्या यांनी चॅम्पियनचा बहुमान मिळवला.औरंगाबाद ब्लॅक बक्सतर्फे आयोजित या मॅरेथॉनमध्ये औरंगाबाद, महाराष्ट्र आणि देशासह विदेशातूनही २ हजारांपेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग नोंदवला. ऐतिहासिक दौलताबाद किल्ला ते जगप्रसिद्ध वेरूळ लेणी यादरम्यान अतिशय नयनरम्य परिसरातून ही मॅरेथॉन झाली. दौलताबाद येथील वॉटरपार्क चा परिसर आज पहाटे पाच वाजल्यापासूनच हजारो महिला-पुरुष धावपटूंनी गजबजून गेला होता. स्पर्धेच्या प्रारंभ स्थळी मैदानावर सर्व धावपटूंकडून वॉर्मिंग अप करवून घेण्यात आले. सकाळी सहा वाजता आमदार अतुल सावे यांच्या हस्ते झेंडा दाखवल्यानंतर या मॅरेथॉनचा श्रीगणेशा झाला. ढोल-ताशांच्या निनादात धावपटंूचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर क्रमाने २१ किलोमीटर आणि दहा किलोमीटर असे गट सोडण्यात आले. पंचेवीस किलोमीटरचा मार्ग हा वेरूळ आणि लेण्यांमधून ठेवण्यात आला होता. मार्गावर जागोजागी मार्गदर्शक फलक, पायलट गाड्या, पाणी, बिस्कीट, गोळ्या, चॉकलेट, संत्री असे धावपटूंसाठी आवश्यक सर्व ठेवण्यात आले होते.आ. अतुल सावे यांच्यासह ज्ञानोबा मुंढे, पुरातत्व विभागाचे शिवकांत बाजपेयी, एमआयटीचे मुनीष शर्मा, यज्ञवीर कवडे, अनिरुद्ध कर्वे, गौरव भारुका, ज्येष्ठ मॅरेथॉन धावक मुंबईचे सतीश गुजराण व मुकुंद भोगले यांच्या उपस्थितीत पदकविजेत्यांना गौरवण्यात आले.औरंगाबाद महामॅरेथॉन जिंकण्याचे लक्ष्य : ज्योती गवतेऔरंगाबाद हेरिटेज मॅरेथॉन जिंकण्याचा विश्वास होताच. गतवर्षी आपण १ तास ४३ मिनिटांत अव्वल ठरलो होतो; परंतु यंदा हवामान आणखी थंड असल्याने १ मिनिटआधीच आपण हे अंतर पूर्ण केल्याचे समाधान वाटते.विशेष म्हणजे अलाहाबाद येथे १९ नोव्हेंबरला आपण ४२ कि. मी.ची मॅरेथॉन जिंकल्यानंतर सराव केला नव्हता. सराव केला असता तर वेळेत आणखी सुधारणा झाली असती.आपले पुढील टार्गेट हे लोकमत समूहातर्फे आयोजित महामॅरेथॉन जिंकण्याचे आणि जानेवारी महिन्यात होणाºया मुंबई मॅरेथॉनमध्ये अव्वल तीन जणांत स्थान मिळवण्याचे आहे, अशी प्रतिक्रिया मराठवाड्याची आंतरराष्ट्रीय महिला मॅरेथॉनपटू परभणीच्या ज्योती गवते हिने लोकमतशी बोलताना व्यक्त केली.