परळी / गेवराई : सहा पालिकांपैकी परळी व गेवराई येथील पालिकेत शुक्रवारी उपनगराध्यक्ष पदांची निवड करण्यात आली. परळीमध्ये राकाँचे अय्युब पठाण, तर गेवराईत राजेंद्र राक्षसुभवनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी स्वीकृत सदस्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. शिवाय, नूतन नगराध्यक्षांनी पदभारही स्वीकारला.शुक्रवारी सकाळी परळी पालिकेत सर्वसाधारण सभा बोलावली होती. राकाँच्या नूतन नगराध्यक्षा सरोजनी सोमनाथआप्पा हालगे यांनी पदभार स्वीकारला. उपनगराध्यक्षपदी अय्युब पठाण यांची वर्णी लागली. स्वीकृत सदस्य म्हणून माजी नगराध्यक्ष सोमनाथआप्पा हालगे, जयपाल लड्डा, अजीज कच्छी यांना लॉटरी लागली. वाल्मिक कराड हे राकाँचे तर सचिन कागदे हे भाजपचे गटनेते बनले आहेत. यावेळी तहसीलदार विद्याचरण कडवकर, मुख्याधिकारी डॉ. बी. डी. बिक्कड यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.गेवराईमध्ये आयोजित सभेमध्ये भाजपचे सुशील जवंजाळ यांनी पदभार स्वीकारला. उपनगराध्यक्ष म्हणून भाजपच्याच राजेंद्र राक्षसभुवनकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. स्वीकृत सदस्य म्हणून देविदास आर्दड, फेरोज अहेमद यांची वर्णी लागली. आ. लक्ष्मण पवार यांनी सत्कार केला. पारदर्शक कारभाराचे आश्वासन दोन्ही नगराध्यक्षांनी यावेळी दिले. (वार्ताहर)
परळीत पठाण, गेवराईत राक्षसभुवनकर उपनगराध्यक्ष
By admin | Updated: December 30, 2016 22:20 IST