नांदेड: रेल्वे बोर्डाकडून मुंबई-सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसचे नवीन वेळापत्रक १ सप्टेंबरपासून लागू होणार आहे़ नवीन वेळापत्रकाच्यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये मात्र एकमत नाही़ मात्र, त्यामुळे प्रवासी संभ्रमावस्थेत आहेत़ नवीन वेळापत्रक नसल्याने आरक्षण तिकिटावर वेळेचा रकाना रिकामा सोडला जात आहे़ मुंबई सीएसटी ते सिकंदराबाद पर्यंत ८७९़१ किलोमीटरपर्यंतचे अंतर पार करणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसचे नवीन वेळापत्रक १ सप्टेंबर २०१४ पासून लागू करण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़ परंतु ३० आॅगस्टपर्यंत नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही़ १ सप्टेंबरनंतरच्या प्रवासासाठी आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना नवीन वेळापत्रक माहिती होत नसल्याने प्रवासी गोंधळलेल्या अवस्थेत आहेत़ आरक्षण तिकिटावर गाडीच्या प्रस्थान व निर्धारित स्थानकावर पोहोचण्याचा उल्लेख केला जातो़ परंतु नवीन वेळापत्रक घोषित केले नसल्याने तिकिटावरील वेळापत्रकाचा रकाना रिकामा सोडला जात आहे़ रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई- सिकंदराबाद देवगिरी एक्स्प्रेसच्या नवीन वेळापत्रक निर्धारित करण्यासंर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये एकमत झाले नसल्याचे समजते़ त्यांच्याकडे वेळापत्रक बदलासंदर्भात पर्याय आहेत़ त्यानुसार देवगिरी एक्स्प्रेस मुंबई येथून अगोदर रात्री ९ ़१७ वाजता निघत होती़ ती निर्धारित वेळेच्या आठ मिनिटे उशिरा म्हणजेच रात्री ९़२५ वाजता निघेल़ मनमाड जंक्शनवर सकाळी २़ १५ वाजेच्या ऐवजी सकाळी २़२६ वाजता, औरंगाबाद सकाळी ४़ ०५ ऐवजी सकाळी ४़ ४७ वाजता, जालना सकाळी ४़ ५८ ऐवजी सकाळी ५़ ५७, परतूर सकाळी ५़ ३८ ऐवजी ६़४० वाजता, सेलू ६़०३ ऐवजी सकाळी ७़ ०६ वाजता, मानवत रोड - ६़ १८ ऐवजी सकाळी ७़ २२ वाजता, परभणी - ७़ १० ऐवजी ७़ ५१, पूर्णा- ७़४८ ऐवजी सकाळी ८़२८ वाजता, श्री हुजूर साहिब नांदेड स्थानकावर सकाळी ८़ २५ वाजता ऐवजी सकाळी ९़ १० वाजता, मुदखेड सकाळी ९़ २३ ऐवजी ९़४४, उमरी - ९़४३ ऐवजी १०़२६, धर्माबाद सकाळी -१०़११ ऐवजी १०़५४ पोहोचेल़ सिकंदराबाद रेल्वेस्थानकावर दुपारी अडीच वाजता पोहोचण्याऐवजी १३ मिनिट उशिराने दुपारी २़४३ वाजता पोहचेल़परंतु या वेळापत्रकास ३० आॅगस्टपर्यंत मान्यता मिळाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले़ नवीन वेळापत्रामध्ये लुज टाईम औरंगाबाद ते नांदेड दरम्यान म्हणजेच मराठवाड्याच्या माथी मारण्याचा प्रयत्न रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून होत असल्याचे जाणवते़ परंतु, अद्यापतरी नवीन वेळापत्रक घोषित केलेले नाही़ (प्रतिनिधी)
देवगिरीच्या नव्या वेळापत्रकावरून संभ्रम
By admin | Updated: August 31, 2014 00:14 IST