शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

श्रीराम नामाने दुमदुमली परभणी

By admin | Updated: April 16, 2016 01:41 IST

परभणी : श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जय श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. सजीव देखाव्यांसह लेझीम

परभणी : श्रीराम नवमीनिमित्त परभणी शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत जय श्रीरामांचा जयघोष करण्यात आला. सजीव देखाव्यांसह लेझीम पथकाने परभणीकरांचे लक्ष वेधले होते. उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या शोभायात्रेत परभणीकरांचाही मोठा सहभाग होता.श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने रामनवमीनिमित्त शुक्रवारी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातून शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेची सुरुवात महंत रघुनाथदास बाबाजी यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. यावेळी खा. बंडू जाधव, आ.डॉ.राहुल पाटील, भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, नगरसेवक डॉ.विवेक नावंदर, अजय गव्हाणे, मकरंद महाराज यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. ही शोभायात्रा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळामार्गे, विसावा कॉर्नर, नारायण चाळ, अष्टभूजा देवी मंदिर, गांधी पार्क, गुजरी बाजार, शिवाजी चौक, नानलपेठमार्गे शनिवार बाजार मैदानापर्यंत काढण्यात आली. शनिवार बाजार येथील मैदानात शोभायात्रेचा समारोप १ हजार जोडप्यांच्या हस्ते महाआरती करुन करण्यात आला. शोभायात्रा पाहण्यासाठी परभणी शहरातील नागरिक, महिला व युवकांची मोठी गर्दी झाली होती. शोभायात्रा काढण्यात आलेल्या मार्गावर जागोजागी रांगोळी काढून शोभायात्रेचे स्वागत भाविकांच्या वतीने करण्यात आले. (प्रतिनिधी)श्रीराम जन्मोत्सव समितीच्या वतीने नियोजनबद्ध पद्धतीने शोभायात्रा काढण्यात आली. प्रथम पाच महिलांनी बुलेट चालवून सुरुवात केली. यानंतर दोन तुतारीवादक, वासुदेव, गोंधळी, २०० मुलींचे लेझीम पथक, एक हजार फेटेधारी, झेंडेधारी महिला, हलगी पथक, महाराष्ट्रीयन वेषभूषेतील १०० मुली, वारकरी महिला व पुरुष, सर्व महाराजांच्या ट्रॉलीतील प्रतिमा, पाच आश्व, रथ देखावा, मुलांचे लेझीम पथक, झांज पथक, वानरसेना, प्रभू श्रीरामांची मूर्ती, झेंडेधारी युवक, साऊंड सिस्टिम, सर्व पुरुष व यानंतर रुग्णवाहिकेसह अग्नीशमन दलाची गाडी असा शोभायात्रेतील देखाव्यांचा क्रम ठेवण्यात आला होता. यात सर्वांचे आकर्षण ठरले ते २०० चिमुकल्यांची वानरसेना. या वानरसेनेत प्रत्येक चिमुकल्याच्या हाती गदा, हनुमानाप्रमाणे त्यांची वेशभूषा करण्यात आली होती.