औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे काम करणाऱ्या औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीतील लेखाधिकारी अनिल गोयल यांच्यावर मंगळवारी सायंकाळी कार्यालयात प्राणघातक हल्ला करण्यात आला. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपनीतील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनी मागील दोन वर्षांपासून शहरात काम करीत आहे. कंपनीने ११५ वॉर्डांमध्ये कामे करण्यासाठी ८९ छोटे-छोटे कंत्राटदार नेमले आहेत. दरमहिना कंत्राटदारांना सुमारे ३ कोटी रुपयांची बिले अदा करण्यात येतात. सध्या कंपनीकडे ४० ते ४५ कोटी रुपयांची बिले थकली आहेत. मागील काही दिवसांपासून कंपनीसोबत काम करणाऱ्या कंत्राटदारांनी बिले द्यावीत म्हणून तगादा लावला आहे. मंगळवारी सायंकाळी कंपनीतील लेखाधिकारी अनिल गोयल नेहमीप्रमाणे काम करीत असताना एक कंत्राटदार त्यांच्याकडे आला. त्याने गोयल यांच्यासोबत वाद घालण्यास सुरुवात केली. कंत्राटदाराने लोखंडी रॉड गोयल यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. त्यांना त्वरित एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, गोयल यांच्या तक्रारीवरून सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. दरम्यान, कंपनीतील सूत्रांनी सांगितले की, आम्ही कोणाचेही पैसे बुडविणार नाही. उलट मनपाने आम्हाला एक संधी द्यावी चांगले काम करून दाखवू असे म्हटले आहे. वैयक्तिक हल्ले करणे कितपत योग्य आहे, असेही सूत्रांनी नमूद केले.मनपाकडून ताबा घेण्याची तयारीमंगळवारी औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मनपाला आपले उत्तर दिले. २२ पानांच्या उत्तरात कंपनीने म्हटले आहे की, आमच्यावरील आरोपांचे आम्ही यापूर्वीच खंडन केले आहे. मनपाला करारात अनेक त्रुटी आहे असे वाटत असेल तर मनपाने करारात दुरुस्ती करावी. मनपाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य राहील. मनपाने कंपनीला काम करण्याची संधी द्यावी असेही त्यात म्हटले आहे. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, कंपनीने आम्हाला उत्तर दिले आहे.आम्ही नोटीसचा अभ्यास करण्यासाठी विधि आणि तांत्रिक विभागाची मदत घेणे सुरू केले आहे. या दोन विभागांचा अभिप्राय आल्यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल. पाणीपुरवठा ताब्यात घेण्यासाठी लागणारी सर्व तयारी प्रशासनाने केली आहे. \औरंगाबाद वॉटर युटिलिटी कंपनीने मनपाला दिलेल्या २२ पानांच्या उत्तरात असंख्य आरोप केले आहेत. मनपाने करार रद्द करण्याची दिलेली नोटीस चुकीची आणि राजकीय दबावाखाली दिली आहे. याशिवाय मनपाकडून वेळोवेळी सहकार्य मिळत नसल्याचा आरोपही यामध्ये करण्यात आला आहे. कंपनीने दिलेल्या नोटीसचा काही अंश.४लवादाची स्थापना करावी असे पत्र लवकरच मनपाला देण्यात येईल. कंपनीने लवादावरील आपल्या प्रतिनिधीचे नाव निश्चित केले आहे. मनपानेही त्यांच्या प्रतिनिधीचे नाव लवकर निवडावे. तिसरा प्रतिनिधीही निवडण्यात यावा.४समांतरचा करार झाल्यानंतर कंपनीने मनपाला प्रकल्प आराखडा सादर केला. त्यात वेळोवेळी बदल करण्यात वेळ वाया घालविण्यात आला. त्याचा परिणाम हायड्रोलिक मॉडेलवर झाला.
समांतरच्या अधिकाऱ्यावर हल्ला
By admin | Updated: August 3, 2016 00:18 IST