शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Pandharpur wari 2018: नाथांच्या पालखीला ४०० वर्षांची परंपरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 00:30 IST

आज सायंकाळी पैठणहून प्रस्थान : सोयी-सुविधा नसल्याने पालखी मार्गाची वाट बिकट

संजय जाधवपैठण : वारकरी संप्रदायास भागवतरूपी खांब देणारे व संप्रदाय समतेची, बंधुतेची पताका सदैव फडकवत ठेवणारे संत म्हणजे शांतिब्रह्म संत एकनाथ महाराज होय. ‘बये दार उघड’ म्हणत शोषित व पिचलेल्या मनात संघर्षाची ठिणगी टाकून त्यांना जागरूक करणाऱ्या संत एकनाथ महाराजांची विचारधारा समस्त वारकºयांनी आजही तेवत ठेवली आहे. सुमारे ४०० वर्षांपासून सुरू असलेल्या आषाढीच्या पंढरपूर वारीसाठी मराठवाडाभरातून वारकरी नाथांच्या पैठणनगरीत जमा होतात व तेथून पुढे आनंदाने ‘भानुदास एकनाथ’ असा जयघोष करीत विठ्ठलाच्या दर्शनाच्या ओढीने पालखीसोबत दरमजल करीत रवाना होतात. ५ जुलै रोजी सायंकाळी पैठणनगरीतून पालखीचे मोठ्या उत्साहात प्रस्थान होणार आहे. वारकºयांनी मोठ्या संख्येने पालखीत सहभागी व्हावे, असे आवाहन नाथांच्या पालखीचे प्रमुख रघुनाथ महाराज गोसावी यांनी केले आहे.वारीची परंपरापैठण ते पंढरपूर या पालखी सोहळ्यास ४०० वर्षांचा इतिहास आहे. संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराज हे विठ्ठलभक्त होते. ते नियमित पैठण ते पंढरपूर आषाढी वारी करायचे. त्यांच्यानंतर एकनाथ महाराज यांच्यापर्यंत पंढरपूर वारी सर्वांनी केली.नाथांच्या पादुकांची वारीसंत एकनाथ महाराजानंतर त्यांचे पुत्र हरिपंडित महाराज यांनी पंढरपूर वारीसाठी संत एकनाथ महाराज यांच्या पादुका घेऊन जाण्याची प्रथा सुरू केली. ती आजतागायत सुरू आहे. हरिपंडित महाराजांना ही प्रथा खंडित होऊ नये म्हणून निजाम राजवटीत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले. एका वारीला तर नाथ महाराजांच्या पादुका गुपचूप नेण्याचा प्रसंग हरिपंडित महाराजांवर ओढवला होता. निजामाच्या शिपायांच्या लक्षात येऊ नये म्हणून त्यांनी पादुका डोक्यावर ठेवून त्यावर फेटा बांधून निजामाची हद्द पार केली; परंतु वारी खंडित होऊ दिली नाही, असे ज्येष्ठ नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज गोसावी यांनी सांगितले.प्रस्थान त्रयी म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज व संत एकनाथ महाराज यांच्या पालखी सोहळ्यास मान आहे. महाराष्ट्रभरातील वारकरी सोयीप्रमाणे या पालखी सोहळ्यात सहभागी होऊन पंढरपूरकडे पायी रवाना होतात. मात्र, संत एकनाथ महाराजांच्या पालखीत सहभागी होणाºया वारकºयांना सोयी-सुविधा व चांगला मार्ग कधीच मिळाला नाही. केवळ पांडुरंगाच्या श्रद्धेच्या बलावर वारी अखंड सुरू आहे.आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकालासंत एकनाथ महाराज यांचे पणजोबा भानुदास महाराज यांनी कर्नाटकच्या अनागोंदीच्या राजाकडून पंढरपूर येथील मंदिरातील विठ्ठलाची मूर्ती परत आणून तिची प्राणप्रतिष्ठा केली. भानुदास महाराजांची विठ्ठल मंदिरात समाधी आहे व याचमुळे नाथ महाराजांच्या पालखीस आषाढीला विठ्ठल मंदिरात गोपालकाला करण्याचा मान मिळालेला आहे. शेकडो वर्षांपासून ही परंपरा सुरू असल्याचे ज्येष्ठ नाथवंशज ह.भ.प. रावसाहेब महाराज, हरिपंडित महाराज, पुष्कर महाराज, योगिराज महाराजांनी सांगितले.पालखीची वाट बिकटसंत एकनाथ महाराज यांच्या पालखीस औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर या पाच जिल्ह्यांतून जवळपास २५० कि.मी. अंतर पायी कापावे लागते. यादरम्यान अनेक ठिकाणी कच्चे रस्तेसुद्धा उपलब्ध नाहीत. शेतातून पायवाटेने डोंगरातून चिखलातून, नदी-नाल्यांतून व दगडगोट्यांतून त्रास सहन करीत वारकºयांना पायी चालावे लागते. यात वृद्ध वयस्कर वारकरी, महिला व पुरुषांचे मोठे हाल होतात.बीड जिल्ह्यात भाविकांनाओढावा लागतो पालखी रथबीड जिल्ह्यात धनगरवाडी, हाटकरवाडी, गारमाथा हा अत्यंत डोंगराळ भाग असून, याठिकाणी साधा रस्तासुद्धा उपलब्ध नसल्याने डोंगरातील पायवाटेने पालखी रथ ग्रामस्थ व वारकºयांना हाताने ४ कि.मी.पर्यंत ओढावा लागतो, तर पावसामुळे नदी-नाल्यास पूर आल्यास तो ओसरेपर्यंत वाट पाहावी लागते.पैठण येथून चनकवाडी येथे जाताना गोदावरी नदीवर पूल बांधावा, पाटेगाव-दादेगाव हा पालखी महामार्गातून सुटलेला रस्ता पालखी मार्गात समाविष्ट करावा, अशी वारकºयांनी मागणी केली आहे.लाडजळगाव ते शेकटा, भगवानगड ते मालेगाव, मिडसावंगी ते मुंगूसवाड, राक्षसभुवन ते रायमोह, खर्डा ते तिंत्रज, एकबुर्जी नांगरडोह, रत्नपूर, अनाळे मुंगशी, बीटरगाव, सोलापूर जिल्ह्यात कव्हे ते कव्हेदंड, गवलेवाडी, कुर्डू, कुर्मदास, अरण, करकंब यादरम्यानचा रस्ता खूपच खराब व वेदनादायी आहे, असे पालखीप्रमुख रघुनाथ महाराज पालखीवाले यांनी सांगितले.नाथांच्या पालखीबाबत शासन उदासीनसंत ज्ञानेश्वर, संत तुकाराम व संत एकनाथ महाराज यांच्या पालखीस प्रस्थान त्रयी म्हणून ओळखले जाते. आळंदी, देहू व पैठण येथून या पालख्या निघतात. दरम्यान, आळंदी व देहू येथून निघणाºया पालखीस राज्य शासन विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून देते. या उलट संत एकनाथ महाराजांच्या पालखीस मूलभूत सोयी-सुविधांसाठी प्रशासनाकडे झगडावे लागत आहे. आरोग्य, पोलीस बंदोबस्त, मुक्कामासाठी जागा, पाण्याच्या टँकरपासून ते पालखीसोबतच्या दिंड्यांना पंढरपूर प्रवेशास लागणाºया पाससाठी संघर्ष करावा लागतो. ग्रामीण भागातून निघणारा व ग्रामीण भागातून जाणारी संत एकनाथ महाराज यांची एकमेव पालखी असून, या पालखीस सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासन उदासीन असल्याचा आरोप वारकºयांनी केला आहे.

टॅग्स :Pandharpur Palkhi Sohalaपंढरपूर पालखी सोहळाPandharpur Wariपंढरपूर वारी