शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
2
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
3
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
4
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
5
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
6
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
7
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
8
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
9
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
10
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
11
लेख: माणूस १०० वर्षांपलीकडे आपले आयुष्य वाढवू शकतो का?
12
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
13
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार
14
Navratri 2025: तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रीला १४ सप्टेंबरपासून सुरुवात
15
संयम अन् सकारात्मकतेमुळे इथवर आलो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उलगडले गुपित
16
जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे चकमक; दोन अतिरेकी ठार
17
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
18
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
19
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
20
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना

पैठणमध्ये आज-उद्या निर्जळी

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

पैठण : जायकवाडी धरणातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीस गळती लागली

पैठण : जायकवाडी धरणातून पैठण शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीस गळती लागली असून ही दुरुस्ती करण्यासाठी दि. १७ व १८ रोजी पैठण शहराला पाणीपुरवठा होणार नसल्याचे न.प. प्रशासनाने घोषित केले आहे.शहरात गेल्या महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत होता. पाण्यासाठी विविध भागांतून नागरिकांची ओरड सुरू झाली होती. दरम्यान, परवा औरंगाबाद रोडवर दूध शीतकरण केंद्राजवळ मुख्य जलवाहिनीस मोठे भगदाड पडल्याने तेथून लाखो लिटर पाणी वाया जाण्यास प्रारंभ झाला. परिणामी शहरातील जलकुंभ क्षमतेने भरत नसल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता.या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम नगरपालिकेने हाती घेतल्याने उद्या मंगळवार व बुधवार रोजी शहरास पाणीपुरवठा होणार नाही, असे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी सांगितले आहे. मुख्य जलवाहिनीची झालेली दुरवस्था व शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शहरास पर्यायी जलवाहिनीच तारू शकते, यामुळे जायकवाडी ते पैठण समांतर जलवाहिनीची मागणी पुढे आली आहे.जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतर पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात येईल, तसेच जलशुद्धीकरण केंद्राची दुरुस्ती सुरू असून शहरास शुद्ध पाणीपुरवठा होईल, असे नगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी सांगितले. (वार्ताहर)जलवाहिनी जीर्ण झालीपैठण शहरास पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जीर्ण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने २००३ ला ही जलवाहिनी नगर परिषदेस हस्तांतरित केली आहे. ही जलवाहिनी सिमेंटची असून ती काळ्या मातीत टाकण्यात आली आहे. ही जलवाहिनी टाकताना परिसरातील काळ्या मातीचे गुणधर्म लक्षात घेऊन जलवाहिनीखाली काँक्रीट बेड करणे गरजेचे होते; परंतु तसे न करण्यात आल्याने प्रत्येक उन्हाळ्यात जमिनीस तडे जाऊन सिमेंटच्या जलवाहिनीला गळती लागते. काळ्या मातीचे होणारे आकुंचन व प्रसरण हे जलवाहिनीस घातक ठरत आहे.