शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

पैठण कारागृहातील बंदिजनांच्या हातची खमंग मिसळ चाखा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2017 00:49 IST

पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या हाताला मोठी ‘गोडी’ लाभली आहे. पैठण -शेवगाव रोडवर नैसर्गिक वातावरणात कारागृहासमोर लाकडी चरक टाकून कारागृह प्रशासनाने या कैद्यांना रसवंती टाकून दिली आहे.

संजय जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कपैठण : पैठण येथील खुल्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांच्या हाताला मोठी ‘गोडी’ लाभली आहे. पैठण -शेवगाव रोडवर नैसर्गिक वातावरणात कारागृहासमोर लाकडी चरक टाकून कारागृह प्रशासनाने या कैद्यांना रसवंती टाकून दिली आहे.या रसवंतीसाठी लागणारा उस कारागृहाच्या शेतीतून घेतला जात असून अत्यंत ताजा व नैसर्गिक उसाचा रस मिळत असल्याने या रसवंतीवर ग्राहकांची संख्या वाढली आहे.क्षणिक रागाच्या भरात हातून गुन्हा घडलेले, सात वर्षांची बंदिस्त शिक्षा भोगलेले व चांगली वर्तणूक असलेल्या कैद्यांना पैठण येथील खुल्या कारागृहात पुढील शिक्षा भोगावी लागते. या कारागृहात या कैद्यांना गुणवत्तेनुसार कामे दिली जातात. पैठण कारागृहाकडे मोठी शेती असून कैद्यांना लागणारा भाजीपाला, अन्नधान्य हे कारागृहातील शेतीत उत्पादित केले जाते. फळभाज्या, पालेभाज्या, गहू, ज्वारी, तूर, सोयाबीन, टिश्यू केळी, ऊस व इतर पिकांचे उत्पादन घेतले जाते. ही शेती कैदीच करतात. पैठण येथील कारागृहातून राज्यभरातील कारागृहात शेतीमाल पाठविला जातो.गुºहाळ लवकरचकारागृहात उसापासून गूळ तयार करण्यात येणार असून गुºहाळ टाकण्याची तयारी सुरू आहे. लवकरच कारागृहात गुळाची निर्मिती सुरू होईल, असे उपमहानिरीक्षक धामणे यांनी सांगितले.रसवंतीगृह सोबत चुलीवरची चहा आणि मिसळ पाव विक्री करणारे हे केंद्र पैठण शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर पैठण - शेवगाव या रस्त्यावर सुरू झाल्याने या रस्त्यावरील प्रवासी या केंद्रावर उसाच्या रसाचा गोडवा आणि चुलीवरील चहा व मिसळ पावचा निर्भेळ स्वाद घेत आहेत.रसवंती व मिसळ पाव सेंटरचा शुभारंभकारागृहाने सुरू केलेल्या रसवंती व मिसळपावचा शुभारंभ शनिवारी कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, चंद्रकांत अलसटवार, कारागृह अधीक्षक सचिन साळवे, तुरुंग अधिकारी, बाळासाहेब जाधव, सीताराम भोकरे, बिबीषण तुतारे, बाबासाहेब गटकळ आदी मान्यवर उपस्थित होते.कारागृहास उत्पन्न मिळणारया उपक्रमातून कैद्यांना रोजंदारी आणि कारागृहाला उत्पन्न मिळणार असल्याने रसवंतीचा हा उपक्रम पैठण तालुक्यातील खुल्या जिल्हा कारागृहाने सुरू केला आहे, असे अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले.लाकडी चरकाही बनवला कारागृहातज्या लाकडी चरक्यापासून ऊसाचा रस काढला जात आहे, तो चरका कारागृहातील जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैदी गंगाधर पांचाळ (रा. बिलोली जि. नांदेड) यांनी तयार केला आहे. ग्राहकांना दहा रुपयात एक ग्लास रस, तर वीस रुपयाला चुलीवरची खमंग मिसळ मिळणार आहे. कारागृहाच्या मालकीच्या शेतात कैद्यांनी ऊस उभा केला असून या ऊसापासून रसवंतीचा हा अभिनव उपक्रम कारागृहाने राबविला आहे, असे कारागृह अधीक्षक सचिन साळवे यांनी सांगितले. कारागृहाच्या या उपक्रमाचे कारागृह उपमहानिरीक्षक राजेंद्र धामने यांनी कौतुक केले. सध्या या कारागृहात जन्मठेप झालेले २५५ कैदी शिक्षा भोगत आहेत.