शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री कार्यालयात जाता येणार नाही, अन्.., 'या' अटींवर CM केजरीवालांना मिळाला जामीन
2
मशाल की विशाल? विश्वजीत कदमांनी नक्की कोणाला दिली ताकद?; ताज्या वक्तव्याने सस्पेन्स वाढवला!
3
“राजन साळवींनी आपल्या आमदारकीची चिंता करावी, मला खासदार करण्यास महायुती सक्षम”: किरण सामंत
4
"अधिक मुलं जन्माला घाला", पोप फ्रान्सिस यांच्याकडून इटलीतील लोकांना आवाहन
5
“मराठा ताकदीने एकत्र आला, PM मोदींना महाराष्ट्रात मुक्काम हलवावा लागला”: मनोज जरांगे
6
"ही ऑफर म्हणजे भाजपा पुन्हा सत्तेत येत नसल्याची कबुलीच", रोहित पवारांचा टोला
7
नरेंद्र मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर; CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
'माझ्यावरील आरोप खोटे होते, त्यावेळी मला वाचवले नाही'; रविंद्र वायकरांचा ठाकरे गटावर आरोप
9
"लाज वाटायला पाहिजे, थोडी तरी...", लखनौच्या मालकांवर मोहम्मद शमीचे टीकेचे बाण
10
आजारपणात या अभिनेत्रीच्या नवऱ्याने सोडली साथ, सलमान खान ठरला देवदूत, आता भाईजानबद्दल म्हणाली...
11
...म्हणजे तुम्ही शरद पवारांना ओळखलंच नाही; जितेंद्र आव्हाडांचा PM मोदींवर निशाणा
12
ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवीन गुरू? BCCI कडून हालचालींना वेग
13
पालघरमधील सहाही आमदार आमच्यासोबत, हितेंद्र ठाकूर यांनी वाढवलं भाजपा आणि ठाकरे गटाचं टेन्शन
14
'चाँदनी'ला अनोखी आदरांजली! अंधेरी लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील चौकाला श्रीदेवीचं नाव
15
"काँग्रेसला मतदान करणं म्हणजे...", नवनीत राणांच्या वक्तव्यावरून वाद, गुन्हा दाखल
16
‘नकली शिवसेनावाले मला जिवंत गाडण्याच्या बाता मारताहेत, म्हणताहेत…’ नरेंद्र मोदींची टीका  
17
ते बालबुद्धीने बोलत असतात; अजितदादांनी डिवचताच शरद पवारांचा आक्रमक पलटवार
18
तुमच्याकडेही SBI चे क्रेडिट कार्ड असेल तर 'हे' जाणून घ्या; होऊ शकते मोठे नुकसान
19
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करतात गंगापूजा; त्याबरोबरच देवघरातील गंगेशी संबंधित नियम वाचा!

वृद्ध कलावंत समितीत पैठण, गंगापूर व छत्रपती संभाजीनगरलाच स्थान!

By स. सो. खंडाळकर | Published: November 10, 2023 11:57 AM

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे.

- स. सो. खंडाळकरछत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्हा वृद्ध कलावंत समितीवर छत्रपती संभाजीनगर, पैठण व गंगापूर या तीन तालुक्याव्यतिरिक्त अन्य तालुक्यांना स्थान मिळालेले नाही. समितीच्या अध्यक्षांसह एकूण दहा सदस्य आहेत. प्रत्येक तालुक्याला एक सदस्य दिला असता तरी नऊ तालुके समितीत समाविष्ट झाले असते. जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या सहीने नुकतीच ही कार्यकारिणी जाहीर झाली.

जिल्ह्यात नऊ तालुके असताना फक्त तीनच तालुक्यांना स्थान मिळण्यामागे काय उद्देश असू शकतो असा प्रश्न वृद्ध कलावंतांना पडला आहे. समितीच्या अध्यक्षपदी पैठणचे सदानंद मगर यांना नियुक्त करण्यात आले आहे. ते केकत जळगाव, ता. पैठणचे आहेत. नामदेव महाराज पोकळे हे सदस्य आहेत. ते आखातवाडा, ता. पैठणचे आहेत. शिवाजी शिंदे हे दरकवाडीचे आहेत. गंगापूर तालुक्याचे दौलतराव मनाळ, कडूबाळ गव्हांदे व गणेश कारभार यांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरचे प्रेषित रुद्रावार, विश्वनाथ दाशरथे, मंगल श्यामराव साोळुंके, वशिष्ठ शिरसाट यांना स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, आपणास समितीवर घेण्याचे आश्वासन देऊनही घेण्यात आले नाही, असा आरोप करीत दिव्यांग कलावंत गजानन रेणुके यांनी १५ नोव्हेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणावर बसणार असल्याचे जाहीर केले आहे. ते भारतीय दिव्यांग हक्क परिषदेचे शहराध्यक्ष आहेत. राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या मानधनासाठी या समितीतर्फे पात्र वृद्ध कलावंतांची निवड केली जाते. समितीचा कालावधी तीन वर्षांसाठी राहील. प्रत्येक तीन वर्षांनंतर समितीची पुनर्रचना करण्यात येते. मात्र समितीची पुनर्रचना होईपर्यंत अस्तित्वात असलेली समिती कार्यरत राहते. वृद्ध कलावंतांना मिळणारे मानधन पुरेसे नाही, ते वाढवण्यात यावे असा आग्रह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादSandipan Bhumreसंदीपान भुमरेartकला