शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपासोबत युती तुटताच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचालींना वेग; बैठका सुरू
2
"मुंबईकर जागा हो, एका परिवाराच्या...", BMC ची निवडणूक जाहीर होताच ठाकरे बंधुविरोधात झळकले बॅनर्स
3
विश्वचषक विजेत्या श्रीलंकन कर्णधाराला अटक होणार; अर्जुन रणतुंगा पेट्रोलियम घोटाळ्याप्रकरणी अडचणीत
4
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८३,६५२ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
5
Yamuna Expressway Accident: ७ बस, ३ कारचा थरकाप उडवणारा अपघात! चार प्रवाशांचा जळून मृत्यू
6
१६ डिसेंबरपासून धनु संक्रांत सुरु; एकीकडे थंडी, तर काही देशात युद्धजन्य स्थितीमुळे तणाव वाढणार!
7
Stock Market Today: शेअर बाजाराच्या कामकाजाची मोठ्या घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ३०० तर निफ्टी १०० अंकांनी घसरला
8
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
9
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
10
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
11
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
12
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
13
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
14
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
15
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
16
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
17
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
18
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
19
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
20
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अजिंठ्याची कलाकृती जगभरात नेणारा ग्रंथ : द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह- टेम्पल आॅफ अजंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 23:31 IST

राम शिनगारे औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय म्हणजे दुर्मिळ ग्रंथांचा खजिनाच. या ग्रंथालयात १० व्या शतकापासून ...

ठळक मुद्देजागतिक पुस्तक दिन विशेष : विद्यापीठातील ग्रंथालयाचा समृद्ध वारसा

राम शिनगारेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे ग्रंथालय म्हणजे दुर्मिळ ग्रंथांचा खजिनाच. या ग्रंथालयात १० व्या शतकापासून ते आजपर्यंतची दुर्मिळ, महत्त्वाची ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ब्रिटिश चित्रकार जॉन ग्रिफिथ यांनी अजिंठा या जगप्रसिद्ध कलाकृतीची पेंटिंग, डिझाईन ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ या ग्रंथात चितारली आहे. हा ग्रंथ दोन खंडात १८९६ आणि ९७ साली ब्रिटनमध्ये प्रकाशित करण्यात आला. जगात मूळ प्रत उपलब्ध असलेल्या एकूण ३ ग्रंथांतील एक प्रत विद्यापीठातील ग्रंथ संग्रहात उपलब्ध आहे.विद्यापीठाच्या स्थापनेनंतर अवघ्या दोन वर्षांनंतर तत्कालीन हैदराबाद राज्याचे उद्योगमंत्री राजे शामराज राजरायन बहादूर यांनी स्वत:च्या ग्रंथालयातील अतिदुर्मिळ ४५ हजार ग्रंथ या ग्रंथालयाला भेट दिले. यातील बहुतांश ग्रंथ हे जागतिक दर्जाचे आहेत. या गं्रथांमध्ये ब्रिटिश कलाकार जॉन ग्रिफिथ यांच्या ‘द पेंटिंग इन द बुद्धिस्ट केव्ह-टेम्पल आॅफ अजंता’ ग्रंथाचा समावेश आहे. दोन खंडात असलेला हा ग्रंथ ड्रॉइंग शीटच्या आकाराचा आहे. एका हातात बसणार नाही, असा हा ऐतिहासिक दस्तऐवज आहे. या ग्रंथात ग्रिफिथ यांनी अजिंठा येथील प्रत्येक लेण्यात असलेल्या पेंटिंग रेखाटल्या आहेत. ज्या पेंटिंग सद्य:स्थितीत अजिंठा येथे अस्तित्वात राहिल्या नाहीत, त्या पेंटिंगचा या ग्रंथात समावेश आहे. तसेच या ग्रंथात प्रत्येक लेणीचा आराखडा, पाणीपुरवठ्याचा नकाशा, लेणीच्या विविध आकाराचे नकाशेही रेखाटण्यात आले आहेत. हा ग्रंथ ब्रिटनमध्ये १८९६-९७ साली प्रकाशित झाला. या प्रकाशनाच्या मूळ ग्रंथापैकी जगात तीनच प्रती अस्तित्वात असल्याची माहिती ग्रंथपाल डॉ.धर्मराज वीर यांनी दिली. यातील एक प्रत विद्यापीठाकडे आहे. या प्रतीचे संगणकीकरण करून ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. हा ग्रंथ विद्यापीठ ग्रंथालयाचे ‘अ‍ॅसेट’ असल्याचे डॉ. वीर यांनी स्पष्ट केले.दुर्मिळ पुस्तकांचा खजिनाविद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेले ४५ हजार ग्रंथ आहेत. यात १६०० ते १८५० या कालखंडातील ३४१४ अतिदुर्मिळ ग्रंथ आहेत. या ग्रंथांच्या ७ लाख ५३६ पानांचे संगणकीकरण करून स्कॅन करण्यात आले आहे. या दुर्मिळ ग्रंथांमध्ये भारतीय राज्यघटना लिहिणाऱ्या व्यक्तींसह घटना समिती सदस्यांच्या स्वाक्षरी असलेली मूळ प्रत आहे. याशिवाय प्रिन्सेस अ‍ॅण्ड चीफस् आॅफ इंडिया, गिल्मसेस आॅफ निजाम डोमिनियन्स, रूबयत उमर खय्याम अशा शेकडो ग्रंथांचा समावेश असल्याचे सहायक ग्रंथपाल सतीश पदमे यांनी सांगितले.ऐतिहासिक पोथींच्या दस्तऐवजांचे स्कॅनिंगविद्यापीठाच्या ग्रंथालयात ३५०० पेक्षा अधिक ऐतिहासिक पोथ्या उपलब्ध आहेत. या पोथ्यांचे डिजिटलायझेशन करण्यासाठी स्कॅनिंगची प्रक्रिया मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर या ग्रंथांचे अस्तित्व कायम राहणार असल्याचे डॉ. धर्मराज वीर यांनी स्पष्ट केले.विद्यापीठाच्या ग्रंथालयात राजे शामराज राजरायन बहादूर यांनी भेट दिलेल्या ग्रंथांशिवाय तब्बल ३ लाख ७० हजार ग्रंथ उपलब्ध आहेत. ई-बुक्सची संख्याही ३० लाखांपेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश ग्रंथांचे डिजिटलायझेशन झाल्यामुळे ग्रंथ नष्ट होण्याचा धोका पूर्णपणे संपला आहे.डॉ. धर्मराज वीर, ग्रंथपाल, विद्यापीठ

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादuniversityविद्यापीठworld book dayजागतिक पुस्तक दिन