शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

पाडापाडी; बिल्डर रस्त्यावर

By admin | Updated: December 8, 2014 00:23 IST

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला

औरंगाबाद : सातारा-देवळाई नगर परिषदेने चटई क्षेत्रा (एफएसआय)च्या नियमात न बसणाऱ्या कामांवर हातोडा चालवला असून, शनिवार आणि रविवारी कारवाई स्थगित असल्याने बिल्डरांनी प्रशासनाच्या विरोधात रस्त्यावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे अर्धा तास वाहतूक खोळंबली अन् पोलिसांची धावपळ सुरू झाली. पोलिसांनी बळाचा वापर केल्यानंतर आंदोलकांची पळापळ झाली. यावेळी पोलिसांनी २१ जणांना ताब्यात घेऊन सायंकाळी जामिनावर सोडले. जयाजी अण्णासाहेब सूर्यवंशी, विशाल गजानन कुलकर्णी, राजेंद्र गजानन कुलकर्णी, नामदेव गणपत बाजड, अश्पाक अमीन, अजमतउल्ला पठाण, शेख अजहर, सय्यद अजहर स. युसूफ अशा आठ आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सातारा परिसरात नगर परिषदेने धोकादायक ३५० नवीन इमारतधारकांना अनधिकृत बांधकाम दाखवून पाडण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. त्या नोटिसांना बिल्डरांनी केराची टोपली दाखवली होती. त्यांनी ग्रामपंचायतीने आतापर्यंत दिलेल्या नोटिशींनाही काही प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे नगर परिषदेच्या नोटिशींनी काय होणार, असा गैरसमज बिल्डर लॉबीचा झाला होता; परंतु न्यायालय व जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांच्या आदेशाने सिंघम प्रशासक विजय राऊत यांनी नगर परिषदेच्या हद्दीतील धोकादायक व एफएसआयच्या नियमात न बांधलेल्या कामांवर हातोडा टाकला. त्यांनी चार दिवसांच्या कालावधीत १२ अतिरिक्त बांधकामांवरील चौथ्या आणि पाचव्या मजल्यावर ब्रेकर आणि हातोडा चालवून ते नष्ट केले. यामुळे बिल्डर लॉबीत प्रशासनाविषयी संतापाची लाट पसरली होती. त्यामुळे त्यांनी ४ डिसेंबर रोजी निदर्शनासाठी परवानगी काढली होती, त्यावेळी काही कारणास्तव निदर्शने रद्द करण्यात आली; परंतु रविवारी सर्वांची कामे बंद असल्याने बिल्डर आणि कामगारांनी रस्त्यावर येऊन आंदोलन केले. पगार मागायला आले अन् पोलिसांनी पकडून नेले...सातारा-देवळाई नगर परिषदेच्या वतीने पाडापाडी सुरू झाल्याने बांधकामे बंद करण्यात आली, त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे.रविवारी मजुरी घेण्यासाठी मजूर आणि फ्लॅटधारकही आता आमच्या घराचे काय, असे विचारण्यासाठी सातारा परिसरात आले होते, त्यांनीही आंदोलनात सहभाग नोंदविल्याने त्यांना अटक करून सायंकाळी जामिनावर सोडून दिले, असे पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले. आम्ही स्वत:हून बांधकाम काढत आहोत...सातारा-देवळाई परिसरात नगर परिषदेने हातोडा कारवाई सुरू केली असून, बहुतांश बिल्डर स्वत:च बांधकामे काढण्यासाठी सरसावले आहेत. त्या प्रकारचे शपथपत्रही प्रशासनाकडे करून दिले आहे, असे बिल्डरच्या वतीने नामदेव बाजड व अन्य पदाधिकाऱ्यांनी सांगितले. लोकशाही मार्गाने आंदोलनाचा पवित्रा सुरूच राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. नियमानुसार हातोडा सुरूच राहील...सातारा-देवळाई परिसरातील एफएसआयच्या नियमात नसलेल्या अतिरिक्त बांधकामांवर आदेशानुसार अतिक्रमण हटाव पथकाचा हातोडा सुरूच राहणार आहे, असे प्रशासक विजय राऊत यांनी सांगितले.