शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

अडथळ्यांवर ‘इच्छाशक्ती’ची मात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 19:15 IST

मागच्या वेळी आलेले अपयश पचवून एव्हरेस्टची जिद्दीने चढाई सुरू केली; पण सुरुवातीपासूनच हवामानाच्या संकटाने डोक वर काढले होते. हवामान विभागाने हिमवर्षावाची वर्दी दिली. त्यातच मोहिमेदरम्यान, आॅक्सिजन सिलिंडरच्या रेग्युलेटरमध्येही बिघाड झाला. या अनंत अडचणींनी एव्हरेस्टची वाट घेरण्यास सुरुवात केली होती. मात्र, इच्छाशक्ती प्रबळ असल्याने अडथळ्यांना पराभूत करीत एव्हरेस्ट सर केले, असा थरारक अनुभव हिमकन्या मनीषा वाघमारे हिने सांगितला.

ठळक मुद्देमराठवाड्याची हिमकन्या मनीषा वाघमारे : ‘एव्हरेस्ट’च्या अवघड वाटेवरचा थरारक अनुभव...

जयंत कुलकर्णी ।औरंगाबाद : मागच्या वेळी आलेले अपयश पचवून एव्हरेस्टची जिद्दीने चढाई सुरू केली; पण सुरुवातीपासूनच हवामानाच्या संकटाने डोक वर काढले होते. हवामान विभागाने हिमवर्षावाची वर्दी दिली. त्यातच मोहिमेदरम्यान, आॅक्सिजन सिलिंडरच्या रेग्युलेटरमध्येही बिघाड झाला. या अनंत अडचणींनी एव्हरेस्टची वाट घेरण्यास सुरुवात केली होती. मात्र, इच्छाशक्ती प्रबळ असल्याने अडथळ्यांना पराभूत करीत एव्हरेस्ट सर केले, असा थरारक अनुभव हिमकन्या मनीषा वाघमारे हिने सांगितला.हिमवर्षावाचे दाट सावट. १०० कि.मी. प्रति तास वेगाने वाहणारे वारे. रक्त गोठवणारे उणे तापमान. अशा प्रतिकूल परिस्थितीत मराठवाड्याच्या मनीषा वाघमारे हिने २१ मे रोजी सकाळी जगातील ८ हजार ८५0 मीटर या सर्वोच्च उंचीवरील एव्हरेस्ट शिखराच्या माथ्यावर पाऊल ठेवले आणि मोहीम फत्ते केली. या अंगावर शहारे आणणाऱ्या मोहिमेचा अनुभव इंडियन कॅडेट फोर्सची कॅडेट गिर्यारोहक मनीषा वाघमारे हिने काठमांडू येथून ‘लोकमत’जवळ कथन केला.ती म्हणाली की, ‘एव्हरेस्ट मोहिमेस सुरुवात झाल्यापासूनच येथे वातावरण प्रतिकूल होते. प्रचंड पाऊस पडत होता. बर्फवृष्टी अखंड सुरू होती. मात्र, एव्हरेस्ट गाठण्याची खूणगाठ मनाशी बांधली होती. १७ मे रोजी बेस कॅम्प येथून निघून दुसºया दिवशी सकाळी १0 वाजता कॅम्प २ वर आम्ही पोहोचलो. एक दिवस तेथे मुक्काम केला. दुसºया दिवशी कॅम्प ३ गाठले. कॅम्प ४ वर चढण्यासाठी सायंकाळी ७ वाजता सुरुवात करायची होती; परंतु हिमवर्षावाला सुरुवात झाली. त्यामुळे रात्री १0.३0 वाजता कॅम्प ४ कडे कूच केली. मार्गक्रमण करताना आॅक्सिजन सिलिंडरचे रेग्युलेटरमध्ये बिघाड झाला होता. त्यातच हिमवादळ येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वेळेत एव्हरेस्टवर पोहोचणे हाच एकमेव मार्ग समोर होता. गतवेळेस १७0 मीटरपासून एव्हरेस्ट सर करण्यापासून वंचित राहिल्यामुळे या वेळेस कोणत्याही परिस्थितीत एव्हरेस्ट सर करण्याचा आपला वज्रनिर्धार होता आणि आपण २१ मे रोजी सकाळी ८ वाजून १0 मिनिटांनी एव्हरेस्टचा माथा गाठण्यात यशस्वी ठरलो. हे फक्त मी प्रबळ इच्छाशक्ती आणि मानसिक कणखरतेमुळेच करू शकले.’आता लक्ष्य माऊंट डेनालीजगातील सात खंडांतील सर्वोच्च उंचीवर असणारे शिखर सर करण्याचे आपले स्वप्न आहे. आतापर्यंत आपण चार खंडातील शिखरे सर केली आहेत. यापुढील आपले लक्ष्य हे उत्तर अमेरिकेतील ६ हजार १९0 मीटर उंंचीवर असणारे माऊंट डेनाली हे शिखर सर करण्याचे आहे.विशेष म्हणजे याआधी मनीषा वाघमारेने एकाच वर्षात आॅस्ट्रेलिया खंडातील शिखर, युरोपमधील माऊंट एल्ब्रूस आणि आता आफ्रिकेतील माऊंट किलिमंजरो ही शिखरे सर केले आहेत.माझे वडील जयकृष्ण, आई सुमन वाघमारे, एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, आयसीएफचे कमांडर विनोद नरवडे, जगदीश खैरनार, सर्व स्पॉन्सर, एव्हरेस्ट टीम आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्याबरोबरचा शेरपा दावा छेरिंग भोटे. यांच्यामुळेच ही खडतर मोहीम मी फत्ते करू शकले, असे मनीषा वाघमारे हिने सांगितले. मनीषा हिला या वर्षी राज्य शासनाच्या प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.परतीचा मार्गही होता खडतरएव्हरेस्ट उतरताना तर जास्त मोठे आव्हान असते. शरीरात शक्ती कमी असते. आॅक्सिजनही कमी असतो. तसेच तुम्हाला स्वत:ची सुरक्षितता नसते.घसरण जास्त असते आणि हिमस्खलन होण्याचा धोकाही असतो. परतीचा मार्ग खडतर होता. उतरताना मार्गात असेच मृत गिर्यारोहक दिसत होते. कॅम्प ४ ला आम्ही त्याच दिवशी दुपारी ४ वाजता पोहोचलो. कॅम्प ४ म्हणजे डेथ झोनच.तिथे उणे हवामान तसेच बर्फच बर्फ असल्यामुळे हिमदंश होण्याचा धोका संभवतो. कॅम्प ४ ला दुपारी ४ वाजता पोहोचल्यामुळे उतरण्यास रात्र होणार होती. त्यामुळे तेथेच मुक्काम करून दुसºया दिवशी पुढील मार्गाकडे कूच केली.’विशेष म्हणजे गतवर्षी मनीषा वाघमारे हिला डेथझोन म्हणून परिचित असणाºया कॅम्प फोर भागात राहावे लागले होते. येथे १२ तास थांबणे म्हणजे मोठेच आव्हान होते. त्यावेळेस मनीषाने प्रतिकूल उणे ७५ अंश तापमानात ४८ तासांचा काळ काढला होता.

टॅग्स :Everestएव्हरेस्ट