शहरं
Join us  
Trending Stories
1
"कोणत्याही महापालिकेत युती तुटलेली नाही, पुढच्या दोन दिवसात...", उदय सामंतांचे विधान, पुणे-संभाजीनगरचं काय?
2
"I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
व्लादिमीर पुतिन यांच्या घरावरील हल्ल्याच्या दाव्यांवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
4
३१ डिसेंबरला स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट आणि झेप्टोचे डिलिव्हरी बॉईज संपावर? कंपन्यांना किती फटका बसू शकतो
5
बीएलएफने पाकिस्तानी सैन्यावर केला मोठा हल्ला; १० सैनिकांना मारल्याचा दावा
6
नाशकात भाजपा कार्यकर्त्यांचा राडा, पैसे घेऊन तिकीट वाटल्याचा आरोप; महाजन म्हणाले, "चौकशी करू..."
7
Pranjal Dahiya : Video - "ओ काका, मी तुमच्या मुलीच्या वयाची..."; गैरवर्तनावर भडकली प्रसिद्ध गायिका
8
Aquarius Yearly Horoscope 2026: कुंभ राशीसाठी नवीन वर्ष 2026: आर्थिक चणचण संपणार! प्रवासातून भाग्योदय आणि सुखद बातम्यांचे वर्ष
9
'बॅटल ऑफ गलवान'च्या टीझरमुळे चीन संतापला; म्हणाले,'भारतीय सैन्याने आधी सीमा ओलांडली...
10
वाघ गावात शिरला, तरुणावर हल्ला केला अन् पलंगावर आरामात झोपी गेला, पाहा Video...
11
'या' मेटल शेअरमध्ये सलग आठव्या दिवशी विक्रमी तेजी; पाहा काय आहे या ऐतिहासिक तेजीचं कारण
12
NMMC Election 2026: ...तर आमदारकीचा राजीनामा देईन; आमदार मंदा म्हात्रेंचं गणेश नाईकांना चॅलेंज, भाजपात वाद पेटला
13
दोघांनी संसाराची स्वप्न बघितली, प्रेमविवाह केला पण भयंकर घडलं; पती-पत्नीमध्ये काय बिनसलं?
14
२०२५ मध्ये भारतीय अब्जाधीशांच्या संपत्तीत मोठी उलथापालथ; मुकेश अंबानी कमाईत अव्वल
15
२०२६ वर्षारंभ गुरुवारी: एका पैशाचा खर्च नाही, कुठेही जायची गरज नाही; ‘अशी’ स्वामी सेवा करा!
16
मराठवाड्यात युतीत फूट; संभाजीनगरनंतर जालना, नांदेड अन् परभणीत भाजप-शिंदेसेना-NCP स्वतंत्र लढणार
17
चहा १० रुपये, वडापाव २० रुपये! विमानतळावर आता मिळणार रेल्वे दरात नाश्ता; कसा घ्यायचा लाभ?
18
मुंबईत मनसेमध्ये बंडखोरी, नाराज अनिशा माजगावकर यांनी प्रभाग क्र. ११४ मधून भरला अपक्ष उमेदवारी अर्ज 
19
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर जोरदार आपटले; Silver ₹३९७३ नं घसरली, Gold किती झालं स्वस्त? पटापट पाहा रेट्स
20
"धमक्या मिळाल्या आणि..." आमिर खानबद्दल भाचा इमरान खानचा खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

'अश्रू, आक्रोश अन् उद्रेक'; तिकीट नाकारल्याने निष्ठावंतांचा संभाजीनगर भाजप कार्यालयात राडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 13:24 IST

संभाजीनगर भाजपमध्ये निष्ठेचा 'बळी'! महिला कार्यकर्त्यांचा कार्यालयात आक्रोश

छत्रपती संभाजीनगर: महायुती तुटल्यानंतर आता भाजपमध्ये उमेदवारी वाटपावरून अंतर्गत वणवा पेटला आहे. वर्षानुवर्षे पक्षाचा झेंडा खांद्यावर घेणाऱ्या निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलून 'आयात' उमेदवारांना झुकते माप दिल्यामुळे आज भाजपच्या प्रचार कार्यालयात संतापाचा मोठा उद्रेक झाला. प्रभाग १९ आणि २२ मधील इच्छुक महिला उमेदवारांनी अक्षरशः अश्रू ढाळत भावना व्यक्त केला. तर काही नाराज कार्यकर्त्यांनी  आत्मदहनाचा इशारा दिल्याने कार्यालयातील वातावरण अत्यंत तणावपूर्ण झाले होते.

संध्या कापसे यांना अश्रू अनावर प्रभाग १९ मधून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेल्या जुन्या कार्यकर्त्या संध्या कापसे यांनी नेत्यांना जाब विचारला. "नेहमी सांगता की कामाला लागा, काम चांगलं आहे, मग तिकीट वाटप करताना दुसऱ्यांना का आणता? आम्ही फक्त कामच करायचं का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सर्वसाधारण प्रवर्गाची जागा असताना ओबीसी महिलेला आयात करून निष्ठावंतांचा गळा घोटला जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

४१ वर्षांची निष्ठा आणि आत्मदहनाचा इशारा प्रभाग २२ मधील महिला सुवर्णा बताडे  तर टोकाची भूमिका घेत आत्मदहनाचा इशारा दिला. "लहान मुले असताना घरादाराची पर्वा न करता पक्षाचे काम केले, लाखो रुपये खर्च केले आणि आज गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना तिकीट दिले जात आहे," असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. तर एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने, "४१ वर्षे पक्षाची सेवा केली, पण ज्यांना आम्हीच नेते म्हणून फिरवले त्यांना तिकीट देऊन आमचा अपमान केला," अशा भावना व्यक्त केल्या.

नोकरी सोडली, पण न्याय मिळाला नाही एका कार्यकर्त्याने नोकरीवर पाणी सोडून भाजप वाढवल्याचे सांगताना, "बाहेरून आलेल्यांना तिकीट दिले जात आहे आणि आम्हा जुन्यांना डावलले जात आहे," असे म्हणत नेत्यांवर टीका केली. कार्यालयातील हा राडा वाढत गेल्याने अखेर पोलिसांनी मध्यस्थी करत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, सावे, कराड आणि शितोळे यांच्याविरोधात कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी असून ही बंडाळी भाजपला निवडणुकीत महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sambhajinagar BJP Faces Outburst: Loyalists Angered by Ticket Denials

Web Summary : Ticket distribution in Sambhajinagar BJP sparks outrage. Loyalists feel ignored, favoring newcomers. Protests erupted, some threatening self-immolation. Police intervened amid rising tensions, potentially impacting election prospects.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Chhatrapati Sambhaji Nagar Municipal Corporation Electionछत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक २०२६BJPभाजपा