बद्रीनाथ मते ,तीर्थपुरीयेथील ३३ केव्हीमधील ५ एमव्हीएचा ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ नोव्हेंबर रोजी जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत येणाऱ्या ११ गावातील शेतीचा वीजपुरवठा बंद करण्यात आला. यातच डाव्या कालव्याला पाणी सोडलेले आहे. त्यामुळे वाहत जाणाऱ्या पाण्याकडे केविलवाण्या नजरेने पाहण्याशिवाय शेकऱ्यांकडे पर्याय नाही. सध्या केवळ गावठाणचाच वीजपुरवठा सुरू आहे.तीर्थपुरी ३३ केव्हीमध्ये ५ एमव्हीएचे दोन रोहित्र असून, त्यातील ५ हजार केव्ही वीजपुरवठा करणारा रोहित्र १३ रोजी रात्री ११ वाजता अचानक जळाल्याने त्या रोहित्रावर तीर्थपुरी गावठाण, कंडारी गावठाण, जिनिंग व रामसगाव शेती पुरवठा अशा वाहिन्या होत्या. तर दुसऱ्या ५ एमव्हीएवर कंडारी, रामसगाव व भायगव्हाण शेती पुरवठा करणाऱ्या वाहिन्या होत्या. या जळाल्याने तीर्थपुरी ३३ केव्ही अंतर्गत सध्या केवळ कंडारी, भायगव्हाण व तीर्थपुरी हिच गावठाण फिडर चालू असून, तीर्थपुरी, कंडारी, मुरमा, भायगव्हाण, खालापुरी, बाचेगाव, खा. हिवरा, शेवता, जोगलादेवी, रामसगाव, रूई असे ११ गावाच्या शेतीला होणारा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद करण्यात आला आहे. सध्या पैठण डाव्या कालव्यातून पाणी पाळी चालू आहे.यातच शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहे. परंतु सध्या शेतीला कापूस, तूर, गव्हासाठी ऊस, फळबागासाठी पाणी घेणे गरजेचे असताना केवळ वीजपुरवठा बंद असल्याने शेतकऱ्यांना पाणी घेता येत नाही. डोळ्यासमोरुन पाणी वाहत जाताना पाहण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय नाही. अशी वाईट अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. वरील ११ गावाच्या जवळपास ३५० डिप्या बंद आहेत. कनिष्ठ अभियंता पवार यांना विचारले असतो, रोहित्राची मागणी केली असून, दोन दिवसात तो रोहित्र येईल, असे सांगितले.या गंभीर प्रकाराकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन संबंधित गावांमधील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. याबाबत वरिष्ठांना निवेदन देण्यात येणार असून तातडीने वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
११ गावांतील शेतीचा वीजपुरवठा बंद
By admin | Updated: November 16, 2014 23:37 IST