शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आधार देणे ही आपलीच गरज- पाटेकर

By admin | Updated: September 8, 2015 00:40 IST

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय.

औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो, आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलोय. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे सद्गदित उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करताना येथे काढले. तेव्हा सभागृहात अनेकांना आपले हुंदके रोखता आले नाहीत. पाणावलेल्या डोळ्यांनी अनेकांनी हे क्षण हृदयात कोरून बळीराजाच्या उतराईसाठी वज्रमूठ कसली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत यावर्षी मृत्यूला कवटाळलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश, साडी व ब्लॅकेटचे वाटप नाना पाटेकर व मराठवाड्याचा भूमिपुत्र, प्रसिद्ध सिनेअभिनेता मकरंद अनासपुरे यांच्यातर्फे सोमवारी करण्यात आले. 1कोणताही पक्ष हा जनतेला सुविधा पुरविण्याचे माध्यम आहे, असे सांगून नाना पाटेकर म्हणाले, मग तो विरोधी पक्ष असो किंवा सरकार. या दुष्काळी परिस्थितीत त्यांनी सोबत येऊन एकत्र काम केले पाहिजे. हा वाईट काळ संपला की तुम्ही परस्परात भांडायला मोकळे आहात. कोणत्याही सरकारवर आपणास टीका करायची नाही, असेही ते म्हणाले. काहीच नाही, काय करू ?2हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच वर्षाचा मुलगा आणि चार वर्षाची मुलगी आहे. तिघेच राहतो. कुणाचाच सहारा नाही. घर नाही. भाड्याने राहते. घरभाड्याला पैसे नाही. काय खाऊ, कसं राहू, असे म्हणत कविता सोमनाथ राऊत या २२ वर्षीय विधवेला रडे आवरले नाही. ती तेथेच धाय मोकलून रडू लागली. नाना पाटेकरांनी सांत्वन करून तिला शांत केले. परंतु त्यानंतर ती एक शब्दही बोलली नाही. ६७ वर्षे झाली स्वातंत्र्याला सरकारने शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली? परंतु आम्ही रॉबिनहूड नाही होऊ शकत, असा उद्वेग व्यक्त करून नाना म्हणाले, सरकार जे देतं ते झिरपत झिरपत खाली जातं. ४हे झिरपणं आम्ही रोखलं पाहिजे. या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठविला पाहिजे.