चौकट :
काळ्या फिती लावून निषेध
पर्यटन व्यावसायिकांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. पर्यटन सुरू करावे, यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी आतापर्यंत नानाप्रकारे शासनाला साकडे घातले आहे; परंतु या मागण्यांकडे सर्रास कानाडोळा केला जात असल्याने दि. २७ रोजी सकाळी ११ वा. पर्यटन व्यावसायिकांनी काळ्या फिती लावून व्हर्च्युअल निषेध नोंदविला. पर्यटनातील १८ असोसिएशनचे सदस्य या बैठकीत सहभागी झाले होते.
चौकट :
आमच्यावरच अन्याय का?
सर्व धार्मिक स्थळे सुरू झाली, चित्रपट गृहे, जीम, हाॅटेल, मॉल व जलतरण तलावही सुरू झाले. मग आमच्यावरच हा अन्याय का, असा सवाल पर्यटन व्यावसायिकांनी उठविला.
चौकट :
पत्रकारांच्या हस्ते चित्रफितीचे उद्घाटन
कोरोनानंतर पर्यटन व्यावसायिकांची बिकट अवस्था सांगणारी चित्रफीत पर्यटन व्यावसायिकांनी बनविली आहे. या चित्रफितीचे उद्घाटन पत्रकार परिषदेस उपस्थित असणाऱ्या काही वरिष्ठ पत्रकारांच्या हस्ते करण्यात आले. ही चित्रफीत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. तसेच आता लवकरच अजित पवार व शरद पवार यांनाही साकडे घालण्यात येईल, असेही त्रस्त व्यावसायिकांनी सांगितले.