शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

विजय मर्चंट ट्रॉफीसाठी उस्मानाबादचा अभिषेक पवार महाराष्ट्राचा कर्णधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 00:44 IST

मुंबई येथे ७ ते ९ डिसेंबदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ आज पुणे येथे जाहीर झाला. महाराष्ट्राचे कर्णधारपद उस्मानाबादचा अभिषेक पवार भूषविणार आहे.

ठळक मुद्दे मराठवाड्याच्या उबेद खान, राजवर्धन हंगरगेकर यांचाही समावेश

औरंगाबाद : मुंबई येथे ७ ते ९ डिसेंबदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीसाठी महाराष्ट्राचा संघ आज पुणे येथे जाहीर झाला. महाराष्ट्राचे कर्णधारपद उस्मानाबादचा अभिषेक पवार भूषविणार आहे. या संघात उस्मानाबादचा राजवर्धन हंगरगेकर आणि नांदेडच्या उबेद खान यांचाही समावेश आहे. महाराष्ट्राची सलामीची लढत मुंबईविरुद्ध ७ ते ९ डिसेंबर रोजी होणार आहे. यानंतर महाराष्ट्राचा सामना पुणे येथे १३ ते १५ डिसेंबदरम्यान बडोदा, १९ ते २१ डिसेंबदरम्यान सौराष्ट्र संघाविरुद्ध होणार आहे. साखळीतील अखेरची लढत महाराष्ट्राची सुरत येथे २५ ते २७ डिसेंबदरम्यान गुजरात संघाविरुद्ध होणार आहे.महाराष्ट्राचा कर्णधार म्हणून निवड झालेल्या अभिजित पवार याने एमसीएच्या निमंत्रित संघांच्या १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत भरीव कामगिरी केली आहे. त्याने नाशिक येथील सामन्यात डीवाय पाटील संघाविरुद्ध नाबाद २०७, धुळे येथील सामन्यात नंदुरबारविरुद्ध ७५, जळगावविरुद्ध नाबाद ५१ धावा केल्या होत्या. तसेच सुपरलीगमध्ये त्याने कॅडेन्स संघाविरुद्ध १२७ धावांची खेळी केली हेती. तसेच मुंबई संघाविरुद्ध सराव सामन्यात १०६ धावा ठोकल्या होत्या.नांदेडच्या उबेद खान यानेही चमकदार कामगिरी करताना ५ सामन्यात ५६.६७ च्या सरासरीने ३४० धावा ठोकल्या होत्या. त्यात त्याने ४ अर्धशतके ठोकली होती. तसेच या संघात निवड झालेल्या उस्मानाबादच्या राजवर्धन हंगरगेकर हा वेगवान गोलंदाज असून, त्याची पश्चिम विभागीय शिबिरासाठी निवड झाली होती. महाराष्ट्राच्या संघात निवड झालेल्या अभिषेक पवार व राजवर्धन हंगरेकर यांना राम हिरापुरे यांचे तर नांदेडच्या उबेद खान याला मोईन अब्दुल रहिम यांचे मार्गदर्शन लाभले आहे.महाराष्ट्राचा संघ : अभिषेक पवार (कर्णधार), अथर्व धर्माधिकारी, दानिश पटेल, हर्षल काटे (उपकर्णधार), कौशल तांबे, उबेद खान, श्रेयस वालेकर, अविराज गावंडे, इस्माईल तांबे, राजवर्धन हंगरगेकर, विकी ओस्वाल, अनिकेत नलावडे, नचिकेत ठाकूर, शुभम खरात.