शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

उस्मानाबादची लातूरवर एक डाव २१३ धावांनी मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 23:53 IST

अभिषेक पवारची कर्णधाराला साजेशी द्विशतकी खेळी आणि त्यानंतर यश लोमटे, सचिन माळी, गिरीश बोचरे यांची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी लातूर संघावर एक डाव आणि २१३ धावांनी मात केली. गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविणाऱ्या अभिषेक पवार याने १७२ चेंडूंत २८ चौकार व ६ षटकारांसह ठोकलेल्या २0३ धावांच्या बळावर उस्मानाबादने त्यांचा पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता.

ठळक मुद्देएमसीए १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा : यश, सचिन, गिरीश चमकले

औरंगाबाद : अभिषेक पवारची कर्णधाराला साजेशी द्विशतकी खेळी आणि त्यानंतर यश लोमटे, सचिन माळी, गिरीश बोचरे यांची सुरेख गोलंदाजी या बळावर उस्मानाबाद संघाने नाशिक येथे सुरू असलेल्या एमसीएच्या १९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत शुक्रवारी लातूर संघावर एक डाव आणि २१३ धावांनी मात केली.गत वर्षी १६ वर्षांखालील विजय मर्चंट ट्रॉफीत महाराष्ट्राचे कर्णधारपद भूषविणाऱ्या अभिषेक पवार याने १७२ चेंडूंत २८ चौकार व ६ षटकारांसह ठोकलेल्या २0३ धावांच्या बळावर उस्मानाबादने त्यांचा पहिला डाव ८ बाद ४१६ धावांवर घोषित केला होता. त्यानंतर कालच्या ३ बाद २९ या धावसंख्येवरून खेळणाºया लातूरचा पहिला डाव २४.१ षटकांत ८२ धावांत आटोपला. त्यांच्याकडून आशितोष पाटील (२४) व यश बारगे (१९) हेच दुहेरी आकडी धावा फटकावू शकले. उस्मानाबादकडून यश लोमटेने २४ धावांत ५ गडी बाद केले. प्रथमेश पाटील, गिरीश बोचरे यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. उस्मानाबादने दुसºया डावात फलंदाजी न करता लातूरवर फॉलोआॅन लादला. लातूरचा दुसरा डाव ३२.५ षटकांत १२१ धावांत संपुष्टात आला. त्यांच्याकडून अर्जुन कावळेने ४१, यश बारगेने ३२ व स्वरूप बैनगिरेने २५ धावा केल्या. उस्मानाबादकडून सचिन माळीने ३१ धावांत ६ व गिरीश बोचरेने ३४ धावांत ४ गडी बाद करीत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.संक्षिप्त धावफलकउस्मानाबाद (पहिला डाव) : ७८ षटकांत ८ बाद ४१६ धावा (घोषित) (अभिषेक पवार २०३, यश लोमटे ५०. दौलत पाटील ४/५०). विजयी विरुद्ध लातूर : पहिला डाव २४.१ षटकांत सर्वबाद ८२. (आशितोष पाटील २४, यश बारगे १९. यश लोमटे ५/२४, प्रथमेश पाटील २/९, गिरीश बोचरे २/६). दुसरा डाव : ३२.५ षटकांत सर्वबाद १२१. (अर्जुन कावळे ४१, यश बारगे ३२, स्वरूप बैनगिरे २५. सचिन माळी ६/३१, गिरीश बोचरे ४/३४).