शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

जैन डॉक्टरांच्या पहिल्या जागतिक अधिवेशनाचे श्रवणबेळगोळ येथे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 01:06 IST

बाहुबली भगवंतांच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्ताने देश-परदेशातील डॉक्टरांचे अधिवेशन १० ते १२ मार्चदरम्यान श्रवणबेळगोळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : बाहुबली भगवंतांच्या ८८ व्या महामस्तकाभिषेक सोहळ्यानिमित्ताने देश-परदेशातील डॉक्टरांचे अधिवेशन १० ते १२ मार्चदरम्यान श्रवणबेळगोळ येथे आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती अधिवेशनाचे संयोजक अध्यक्ष डॉ. सन्मती ठोले यांनी दिली.या अधिवेशनात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ नि:शुल्क सेवा देणार आहेत. या अनुषंगाने श्रवणबेळगोळ येथील समस्त ग्रामस्थांसाठी मोफत रोगनिदान शिबिराचे आयोजन बाहुबली सामान्य रुग्णालयात करण्यात येणार आहे. यासाठी डॉ. अक्षय ठोळे व ऊर्वशी जैन यांच्यातर्फे अडीच लाखांच्या औषधी मोफत उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.अधिवेशनाच्या उद््घाटनप्रसंगी प. पू. मुनी १०८ चिन्मयसागरजी महाराज यांच्या मंगल सान्निध्यात व प. पू. जगतगुरू स्वस्तिश्री चारुकीर्ती महास्वामी यांच्या मार्गदर्शनात होणार आहे. ११ मार्च रोजी महामस्तकाभिषेकानंतर देशातील नामांकित तज्ज्ञांना सन्मानित करण्यात येणार आहे. देश व आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संशोधन कार्य, समाजोपयोगी कार्य, धर्म संरक्षण हेतू कार्य केलेले आहे, अशा चिकित्सकास बाहुबली पुरस्कार, चिन्मय चिकित्सारत्न पुरस्कार, चिन्मय चिकित्सा सुवर्ण पुरस्कार, चिन्मय चिकित्सा रजत पुरस्काराने सन्मानित केले जाईल, असे चिन्मयसागर चॅरिटेबल ट्रस्टचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश मोदी यांनी कळविले आहे. तसेच या पुरस्कारांत जे चिकित्सक संयममार्गावर अगे्रसर आहेत, त्यांना जैनाचार्य संत शिरोमणी १०८ श्री.विद्यासागर महाराज यांच्या संयम सुवर्ण महोत्सवानिमित्ताने संयम सुवर्ण महोत्सव पुरस्काराने सन्मानित केले जाईल. या अधिवेशनात देशातील नामांकित तज्ज्ञांद्वारे ‘जैन जीवन पद्धत सर्व मानव जीवनास उपयोगी कशी आहे’ या विषयावर चर्चा होणार आहे. या अधिवेशनाचे संयोजक प्रख्यात मज्जारोगतज्ज्ञ डॉ. डी. सी. जैन ( नवी दिल्ली) व विलासपूरचे डॉ. अरहतशरण जैन राहतील. या अधिवेशनाच्या वेबसाईटचे विमोचनदेखील झाले. अधिवेशनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.