शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

शनिवारी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संमेलन लोकमत आयोजित उपक्रम

By admin | Updated: August 7, 2014 01:30 IST

नांदेड : ९ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आयोजिण्यात आले आहे़

नांदेड : लोकमत नांदेड प्रिंटिंग युनिटच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून ९ आॅगस्ट रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन विद्यार्थी संमेलन आयोजिण्यात आले आहे़ कै़ डॉ़ शंकरराव चव्हाण सभागृहात तीन सत्रामध्ये हे संमेलन होईल़लोकमतने शेती, शिक्षण आणि आरोग्य या महत्त्वपूर्ण विषयांवर विविध उपक्रम राबविण्याचा पायंडा निर्माण केला आहे़ त्याचाच एक भाग म्हणून शनिवारी सकाळी १० ते दुपारी १२़३० दरम्यान स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे़ त्यात पुणे येथील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक तथा राजमुद्रा ग्रंथाचे लेखक प्रा़मनोहर भोळे तसेच नांदेडचे सहाय्यक पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांचे मार्गदर्शन होणार आहे़ यावेळी प्रा़ भोळे हे 'एमपीएससी अभ्यास व काळजी' या विषयावर विद्यार्थ्यांना माहिती देतील़ तसेच सहाय्यक पोलिस अधीक्षक देशमुख हे स्पर्धा परीक्षेचा दृष्टिकोन आणि दिशा यावर बोलतील़ विशेष म्हणजे उपस्थित विद्यार्थ्यांच्या निवडक प्रश्नांवर शेवटच्या सत्रात चर्चाही होणार आहे़ नांदेड शहरात राज्य लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे हजारो विद्यार्थी महाविद्यालय, अभ्यासिकांच्या माध्यमांतून स्पर्धेला सामोेरे जात आहेत़ मुंबई, पुण्याच्या बरोबरीने नांदेडच्या विद्यार्थ्यांनीही स्पर्धा परीक्षेत स्वत:चा ठसा निर्माण केला आहे़ त्याला जोड देणारा हा उपक्रम ठरेल असेही संयोजकांनी कळविले आहे़दरम्यान, सदरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन संमेलन सर्व विद्यार्थ्यांसाठी खुले असून प्रथम येणाऱ्यांना प्रथम आसन असणार आहे़ तसेच तिन्ही सत्र वेळेवर सुरू होतील, असेही कळविण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)