शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संघटनेने क्लब क्रिकेट, साखळी स्पर्धा सुरू करण्यास पुढाकार घ्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 00:49 IST

औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.

ठळक मुद्देखेळाडू संघटनेची मागणी : एडीसीए मैदानावरील टेनिसबॉलवरील स्पर्धा बंद करा

औरंगाबाद : औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंना जिल्हा संघटनेतर्फे स्पर्धेचे आयोजन होत नसल्यामुळे त्यांना औद्योगिक स्पर्धेत खेळावे लागते. तेथे त्यांचा कस पणाला लागत नाही. त्यामुळे औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेने एडीसीए मैदानावर होणारे टेनिस बॉलवरील क्रिकेट स्पर्धा बंद कराव्यात आणि क्लब क्रिकेट आणि साखळी क्रिकेट स्पर्धा सुरू कराव्यात, अशी मागणी खेळाडू संघटनेने आज औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर झालेल्या बैठकीत केली आहे.सध्या जिल्हा क्रिकेट संघटनेच्या मैदानावर टेनिस बॉलच्या क्रिकेट स्पर्धाच जास्त होत आहेत. औरंगाबादेतील प्रतिभावान खेळाडूंसाठी जिल्हा क्रिकेट संघटनेतर्फे स्पर्धांचे आयोजन होत नाही. त्यामुळे त्यांना औद्योगिक क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास भाग पडते. तेथे या स्पर्धेचा अनुभवाच्या दृष्टीने विशेष फायदा खेळाडूंना होत नाही. त्यांचा कस तेथे लागत नाही. त्यामुळे जिल्हा क्रिकेट संघटनेने १४, १६ व १९ वर्षांखालील तसेच सिनिअर गटासाठीदेखील स्पर्धेचे आयोजन करून त्यांना जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळायला हवी. त्याचप्रमाणे स्पर्धेआधी त्यांचा दोन महिने कसून सराव घेतला जावा; परंतु ऐनवेळी संघ निवडला जातो. खेळाडूंना अनुभव मिळावा यासाठी वनडे स्पर्धेची क्लब क्रिकेट स्पर्धा आणि दोनदिवसीय सामन्यांचे आयोजन करण्यास जिल्हा क्रिकेट संघटनेने पुढाकार घ्यायला हवा, असे खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. विकास नगरकर याच्यावरील बंदी हटल्यानंतरही शहीद भगतसिंह क्रिकेट स्पर्धेत खेळू न दिले जाणे हा स्पर्धा आयोजकांकडून खेळाडूंचाच नव्हे, तर जिल्हा क्रिकेट संघटनेचा अपमान असल्याची भावनाही यावेळी खेळाडू संघटनेने व्यक्त केली. सध्या पंचदेखील स्पर्धा आयोजित करतात. त्यामुळे पंचांनी अशा वेळेस फक्त आयोजकांचीच भूमिका पार पाडायला हवी, त्यांनी पंचांची जबाबदारी पार पाडू नये. पंचांनीही काही वाद असेल तर मैदानातच सोडवायला हवेत, असेही खेळाडू संघटनेचे म्हणणे आहे. बैठकीत औरंगाबादचे ज्येष्ठ खेळाडू आणि प्रशिक्षक शेख हबीब यांनी खेळाडूंच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ज्येष्ठ खेळाडू दिनेश कुंटे, प्रशिक्षक विनोद माने, कर्मवीर लव्हेरा, शेख रफिक, पंकज फलके, मिलिंद पाटील, विजय अडलाकोंडा, बॉबी खेत्रे, विवेक येवले, प्रदीप जगदाळे, विकास नगरकर, वसीम खान, संदीप जाधव, प्रीतेश चार्ल्स, अजय काळे, प्रदीप जाधव, विशाल नरवडे, पंच अ‍ॅड. बाळासाहेब वाघमारे, विद्याधर पांडे, सिद्धार्थ भरणे, बळवंत चव्हाण आणि विनोद जाधव यांची उपस्थिती होती.