शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश

By admin | Updated: December 2, 2014 01:09 IST

औरंगाबाद : मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी दुसरेच बदली कर्मचारी शहराची सफाई करून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.

औरंगाबाद : मनपातील सफाई कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी दुसरेच बदली कर्मचारी शहराची सफाई करून प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत. बदली कर्मचाऱ्यांचा शोध घेण्याचे आदेश आस्थापना विभागाला दिल्याचे आयुक्त पी.एम. महाजन यांनी सांगितले. मनपा कर्मचाऱ्यांनी ५.३० वा. कामावर हजर राहणे गरजेचे आहे. ६.३० वाजेपर्यंत सफाईचा एक राऊंड झाला पाहिजे. त्यानंतर वर्दळ सुरू होते. त्यामुळे सफाई करता येत नाही. साफसफाईचा आढावा घेताना अनेक ठिकाणी बदली कामगार असल्याचे आढळून आले. सफाई विभागातील अनेक कर्मचारी दुसरीकडे काम करीत आहेत, तर काही अधिकाऱ्यांच्या दिमतीला आहेत. त्यामुळे कोण कुठे सफाई करतो आहे, याची माहितीही आयुक्तांनी मागविली आहे. रस्त्याच्या सौंदर्यीकरणासाठी दुभाजक असतात. त्यामध्ये नागरिकांनी कचरा आणून टाकणे चांगले नाही. नागरिकांनी स्वयंशिस्त बाळगली पाहिजे. दुकानदारांनी रात्री दुकान बंद करतानाच कचरा बाहेर टाकला पाहिजे. जेणेकरून तो सकाळी पहिल्या टप्प्यातच उचलला जाईल. ते दिवसा कचरा आणून टाकतात. तो वारंवार उचलला जात नसल्यामुळे तसाच पडून राहतो, असे आयुक्त म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आलेल्या स्वच्छता अभियानामुळे नागरिकांमध्ये जनजागृती झाली असून त्याचा फायदा झाला आहे. नगरसेवक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था स्वच्छतेच्या मोहिमांमध्ये सहभागी होत आहेत. जनजागृती होत असून नागरिकांना आता जाणीव होत असल्याचे आयुक्त महाजन म्हणाले.रोशनगेट परिसरात आयुक्त महाजन स्वच्छतेची पाहणी करीत असताना एक अजब माहिती समोर आली होती. दुभाजकावर सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यास आयुक्तांनी विचारले, ‘तू इथं केव्हापासून काम करतो आहेस’, त्या कर्मचाऱ्याला ते आयुक्त आहेत हे माहिती नसावे. त्याने सांगितले, मी आज बायकोच्या जागी सफाई करीत आहे. मी व माझी बायको दोघेही मनपा सेवेत असल्याचेही त्याने आयुक्तांना सांगितले. आयुक्तांना हा प्रकार कळल्यानंतर ते अवाक् झाले होते. आयुक्तांनी त्याला नाव विचारले, त्याने चुकीचे नाव सांगून वेळ मारून नेली होती. मात्र, आज आयुक्तांनी त्या कर्मचाऱ्याचे नाव, तो व त्याची बायको पालिका सेवेत केव्हापासून आहेत, याची माहिती आस्थापना विभागाकडून मागविली आहे.