शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

घाटीमधील प्राध्यापकाच्या ‘आरटीओ’तील ‘अर्थ’पूर्ण सेवेच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 20:45 IST

‘डीएमईआर’ने घाटी प्रशासनाकडून घेतली सविस्तर माहिती 

ठळक मुद्देवैद्यकीय क्षेत्रातील अनेकांकडून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापकांकडून आरटीओ कार्यालयात ५० रुपयांत अवघ्या ५ मिनिटांत नागरिकांना वैद्यकीय प्रमाणपत्राची खैरात दिल्याची वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

घाटीतील मेडिसिन विभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. उद्धव खैरे यांच्याकडून आरटीओ कार्यालयात कोणत्याही तपासणीविनाच वैद्यकीय प्रमाणपत्र देत होते. हा प्रकार ‘लोकमत’ने १४ आॅक्टोबर रोजी ‘घाटीतील प्राध्यापकांची आरटीओत सेवा’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून समोर आणला. या प्रकरणाने वैद्यकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. हे प्रकरण थेट वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयापर्यंत पोहोचले आहे. 

‘डीएमईआर’ने या प्रकरणाविषयी घाटी प्रशासनाकडून माहिती घेत, संपूर्ण प्रकाराची बारकाईने चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चालकांना वैद्यकीय प्रमाणपत्र देताना कोणतीही वैद्यकीय तपासणी केली जात नव्हती. चौकशी दरम्यान, या सगळ्या बाबींची पडताळणी केली जाणार आहे. त्यामुळे आता चौकशी होऊन संबंधित सहयोगी प्राध्यापकांवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

मेडिसिन विभागात सहयोगी प्राध्यापक आणि पथक (युनिट) क्रमांक-५ चे प्रमुख म्हणून डॉ. खैरे कार्यरत आहेत. डॉ. खैरे आरटीओ कार्यालयात थेट एजंटांच्या गराड्यात उभे राहून वैद्यकीय प्रमाणपत्र देत होते. तेही कोणत्याही वैद्यकीय तपासणीविना. या प्रकाराने घाटी रुग्णालय आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनेकांकडून संतापही व्यक्त करण्यात येत आहे.

चौकशीनंतर कारवाईयाप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विभागीय चौकशी केली जाईल. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.- डॉ. तात्याराव लहाने, संचालक, वैद्यकीय शिक्षण आणि  संशोधन संचालनालय

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसAurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी