शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदन करणाऱ्या ‘त्या’ डॉक्टरच्या चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 00:56 IST

घाटी रुग्णालयात हाऊस आॅफिस पदावर कार्यरत असलेल्या पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेऊन न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

ठळक मुद्देकानन येळीकर : तात्काळ चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : घाटी रुग्णालयात हाऊस आॅफिस पदावर कार्यरत असलेल्या पत्नीच्या नावे निवासी वैद्यकीय अधिकारी असलेला पतीच शवविच्छेदन करीत असल्याचे ‘लोकमत’ने बुधवारी चव्हाट्यावर आणले. त्यानंतर घाटी रुग्णालय प्रशासनाने याची गंभीर व तात्काळ दखल घेऊन न्यायवैद्यकशास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. या चौकशीचा अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचना आपण दिल्याची माहिती अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहरातील घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश आणि बुलडाणा आदी जिल्ह्यांतून रुग्ण येतात. या रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण विविध विभागांत दाखल होतात. काहींचा उपचारादरम्यान मृत्यू होतो. मृत्यूचे कारण स्पष्ट न झाल्यास शवविच्छेदन अहवालातून त्याचे कारण स्पष्ट केले जाते. रुग्णालयाच्या आवारातच शवविच्छेदन विभागात मृतांचे शवविच्छेदन केले जाते. शवविच्छेदन करण्याचे काम हाऊस आॅफिस पदावरील व्यक्तीचे असते; पण या पदावरील महिला ही शवविच्छेदन न करता त्यांचा पतीच करीत असल्याचे मंगळवारी आढळून आले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. विकास राठोड यांनी पत्नी डॉ. अश्विनी राठोड यांच्या नावे मंगळवारी दिवसभर मृतांचे शवविच्छेदन केले. दिवसभरात शवविच्छेदन प्रक्रियेत कुठेही सहभागी नसलेल्या डॉ. अश्विनी राठोड यांनी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास घाटी रुग्णालयात दाखल होत शवविच्छेदन अहवालांवर स्वाक्षºया केल्याचेही दिसून आले. ‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारी प्रकाशित केले. या वृत्तातून घाटी रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आणला. याचे पडसाद घाटी रुग्णालयात बुधवारी उमटले. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी न्यायवैद्यक शास्त्र विभागप्रमुख के.यू. झिने यांना या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. याचा चौकशी अहवाल तात्काळ सादर करण्याच्या सूचनाही केल्याचे डॉ. येळीकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. घाटी रुग्णालय प्रशासन यावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.निवासी डॉक्टरला बजावली नोटीस‘पत्नीच्या नावे पतीच करतोय शवविच्छेदन’ अशा आशयाचे वृत्त बुधवारी ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास राठोड यांना तात्काळ खुलासा सादर करण्याचे आदेश घाटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भारत सोनवणे यांनी बुधवारी दिले. तशा आशयाची लेखी नोटीसही बजावण्यात आली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीdocterडॉक्टर