शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमधील बोगस शिक्षक नियुक्त्या प्रकरणी प्रधान सचिवांनी दिले ‘फौजदारी’चे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:07 IST

अपंग समावेशित युनिटमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा बनाव करीत यादीमध्ये अनेक नावे घुसडण्यात आली आहेत. अशा बोगस यादीतील विशेष शिक्षकांची सत्यता न पडताळताच औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे युनिट पुनर्स्थापित करण्यात आले असून, सर्रासपणे अशा युनिटमध्ये बोगस विशेष शिक्षकांना नेमणुकाही देण्यात आल्या आहेत. हे बोगस विशेष शिक्षक, तसेच त्यांच्या सेवा पुनर्स्थापित करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत. 

औरंगाबाद : अपंग समावेशित युनिटमध्ये विशेष शिक्षक म्हणून कार्यरत असल्याचा बनाव करीत यादीमध्ये अनेक नावे घुसडण्यात आली आहेत. अशा बोगस यादीतील विशेष शिक्षकांची सत्यता न पडताळताच औरंगाबादसह अनेक जिल्ह्यांमध्ये हे युनिट पुनर्स्थापित करण्यात आले असून, सर्रासपणे अशा युनिटमध्ये बोगस विशेष शिक्षकांना नेमणुकाही देण्यात आल्या आहेत. हे बोगस विशेष शिक्षक, तसेच त्यांच्या सेवा पुनर्स्थापित करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिले आहेत. 

सोमवारी ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांशी संवाद साधला. अपंग समावेशित योजनेत बोगस शिक्षकांना नियुक्ती देणारे राज्यस्तरीय मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय असीमकुमार गुप्ता यांनी व्यक्त केला. शिक्षण संचालकांनी ७ जुलै २०१५ रोजी माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत अपंग समावेशित युनिट बंद करून या युनिटवर कार्यरत विशेष शिक्षकांच्या सेवाही समाप्त केल्या होत्या. सन २०१० नंतर राज्यात या युनिटअंतर्गत एकाही विशेष शिक्षकाची नेमणूक केलेली नाही. 

सन २००९ ते २०१० पर्यंत अपंग समावेशित युनिट अंतर्गत मूळ ९९५ विशेष शिक्षक नियुक्त करण्यात आले होते; परंतु सध्या राज्यभरात विशेष शिक्षकांच्या बनावट याद्या फिरत असून, वेगवेगळ्या याद्यांमध्ये ३ ते साडेतीन हजार शिक्षकांच्या नावांचा समावेश आहे. प्रामुख्याने नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना जिल्ह्यामध्ये अपंग समावेशित युनिट पुनर्स्थापित करण्यात आल्याची माहिती मिळाली असून, यामध्ये सर्रासपणे बोगस विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आल्याची बाब समोर आली आहे. 

सन २०१० नंतर विशेष शिक्षक म्हणून ज्यांनी नियुक्ती आदेश सादर केलेले असतील, अशा विशेष शिक्षकांची पडताळणी करून दोषी विशेष शिक्षक व युनिट पुनर्स्थापनेबाबत निष्काळजीपणा करणार्‍या जि.प. शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचार्‍यांविरुद्ध मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असे स्पष्ट आदेश काल सोमवारी प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी दिल्यापासून शिक्षण विभागातील अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे. ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्ता यांनी सोमवारी दिलेल्या या आदेशानुसार औरंगाबाद जि.प. प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे शिक्षण विभागासह सर्वांचेच लक्ष लागले आहे.

‘लोकमत’ने  आणले प्रकरण चव्हाट्यावर... प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी व कर्मचार्‍यांनी जि.प. प्रशालांमध्ये अपंग समावेशित युनिट पुनर्स्थापित केले असून, त्याठिकाणी ११ बोगस विशेष शिक्षकांच्या सेवाही पुनर्स्थापित केल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने १६ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिद्ध केले. मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे आर्दड यांनी या वृत्ताची दखल घेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिरसे यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी समिती नेमली. या समितीनेही ‘लोकमत’च्या वृत्तास दुजोरा देत जिल्ह्यात अपंग समावेशित युनिट व त्यामध्ये विशेष शिक्षकांच्या सेवा पुनर्स्थापित करण्याची प्रक्रिया ही संपूर्णपणे चुकीची राबवल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवला आहे. नियुक्त करण्यात आलेले सर्व ११ युनिट व ११ विशेष शिक्षक हे बोगस असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे.