शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीतील गर्दीवर पर्याय; शहरातील नऊ झोनमध्ये ४० ठिकाणी भरणार भाजी मंडई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 12:10 IST

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना जाधववाडी येथे मात्र फळ, भाजी खरेदी-विक्रीसाठी प्रचंड गर्दी होत आहे.

ठळक मुद्देशेतकरी व किरकोळ विक्रेते हे बाजार समितीचे कर्मचारी व खासगी सुरक्षारक्षकांना दाद देत नाही. एकाच वेळी येथे १० ते १५ हजार नागरिक एकत्र येतात व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो.

औरंगाबाद : जाधववाडी येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात फळ, भाजीपाला अडत बाजारात खरेदी-विक्रीसाठी होणारी प्रचंड गर्दी रोखण्यासाठी महानगरपालिकेने किरकोळ भाजी विक्रीचे विकेंद्रीकरण केले आहे. शहरातील नऊ झोनमध्ये ४० ठिकाणी सकाळी ६ ते ११ च्या दरम्यान मंडई भरविण्यात येणार आहे.

कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असताना जाधववाडी येथे मात्र फळ, भाजी खरेदी-विक्रीसाठी प्रचंड गर्दी होत आहे. एकाच वेळी येथे १० ते १५ हजार नागरिक एकत्र येतात व सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडतो. शेतकरी व किरकोळ विक्रेते हे बाजार समितीचे कर्मचारी व खासगी सुरक्षारक्षकांना दाद देत नाही. यामुळे येथे वाढणारी गर्दी जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी बनली होतीच. शिवाय कोरोना संसर्ग वाढविण्यास येथील मंडई कारणीभूत ठरत असल्याचा ठपकाही येण्याची शक्यता होती.

अडत बाजारातील गर्दी रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून सोमवारी (दि. २९) सकाळी जिल्हा प्रशासनातील अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, महापालिकेचे अधिकारी, बाजार समितीचे सभापती, सचिव, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष, अडत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी यांनी पहिल्यांदाच एकत्र येऊन बैठक घेतली. किरकोळ विक्रेते व ग्राहकांमुळे अडत बाजारात प्रचंड गर्दी होत असल्याने किरकोळ बाजाराचे विकेंद्रीकरण करण्याचा निर्णय झाला.सायंकाळी महापालिका प्रशासनाने नवीन आदेश काढून शहरातील नऊ झोनमधील ४० ठिकाणी किरकोळ फळ व भाजीपाला विक्रीला परवानगी दिली. याची अंमलबजावणी आज, ३१ मार्चपासून करण्यात येणार आहे. यामुळे ग्राहकांना आता अडत बाजारात जाण्याची गरज नाही. लॉकडाऊनच्या काळात घराच्या परिसरात भाजी मंडईमध्ये भाजीपाला मिळेल.

हातगाडीवाल्यांनी फिरती विक्री करावीमहापालिका प्रशासनाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, हातगाडीवाल्यांनी एकाच ठिकाणी थांबू नये. अंतर्गत रस्त्यांवर फिरून त्यांनी फळे, भाजीपाला विकावा. सोशल डिस्टन्सिंगचे पालन हवे; तसेच विक्रेत्यांनी मास्क घालणे व सॅनिटायझर ठेवणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

झोन क्र. किती ठिकाणी मंडई भरणारझोन १             ६झोन २             ४झोन ३             ३झोन ४             ४झोन ५             ६झोन ६             ३झोन ७             ५झोन ८             ३झोन ९             ६

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या