लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : मुंबई येथील रेल्वेस्टेशनवर घडलेली घटना ही दुर्देवी आहे़ अशा घटनेची नांदेडात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने विशेष काळजी घेण्याची गरज आहे़ त्यासाठी नांदेड रेल्वेस्थानकावर पर्यायी पादचारी पूल उभारावा, अशी सूचना माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण यांनी केली़मराठवाड्यात औरंगाबादनंतर नांदेड हे महत्वाचे रेल्वेस्टेशन आहे़ ऐतिहासिकदृष्ट्या नांदेडचे वेगळे महत्व आहे़ त्यामुळे देशभरासह विदेशातून येणाºया भाविक आणि नागरिकांची संख्याही मोठी असते़ दिवसभरात जवळपास ७० हून अधिक रेल्वे नांदेड स्टेशनवरुन ये-जा करतात़ नंदीग्राम, देवगिरी, सचखंड या एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळी तर प्रवाशांची मोठी गर्दी असते़ त्यात मोठा गाजावाजा करुन सुरु करण्यात आलेले रेल्वेस्टेशनवरील दोन्ही सरकते जिने बंद आहेत़ त्यामुळे प्रवाशांना जाण्या-येण्यासाठी अरुंद असलेल्या पादचारी पुलाशिवाय पर्याय राहत नाही़प्रवाशांची गर्दी लक्षात घेता हे पादचारी पूल अपुरे ठरत आहेत़ त्यामुळे मुंबईसारख्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने वेळीच काळजी घेणे गरजेचे आहे़देवगिरी एक्स्प्रेस फलाटावर असताना त्याचवेळी सचखंड व इतर पॅसेंजर गाड्याही असतात़ त्यामुळे हजारो नागरिक एकाचवेळी रेल्वेस्टेशनमधून बाहेर पडतात़ त्यामुळे या ठिकाणी आणखी एक पर्यायी पादचारी पूल उभारण्याची गरज आहे़ त्याचबरोबर प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशा सूचनाही खा़अशोकराव चव्हाण यांनी रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना केल्या़
पर्यायी पादचारी पूल उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 00:26 IST